स्मरणशक्ती वाढवायची असेल तर 'हे' पदार्थ खाणे टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 10:34 AM2018-06-29T10:34:48+5:302018-06-29T10:35:00+5:30
तुम्हाला जर ही समस्या असेल आणि स्मरणशक्ती वाढवायची असेल तर खालील पदार्थ कमी खाणे फायद्याचे ठरेल.
मोबाईलच्या म्हणा किंवा आजच्या सोयी सुविधांच्या वस्तू म्हणा यामुळे अनेकांना स्मरणशक्ती कमी झाल्याची समस्या होऊ शकते. यासोबतच स्मरणशक्तीसाठी आवश्यक पोषक तत्वे न मिळाल्यासही स्मरणशक्ती कमी होते. अशात तुम्हाला जर ही समस्या असेल आणि स्मरणशक्ती वाढवायची असेल तर खालील पदार्थ कमी खाणे फायद्याचे ठरेल.
1) सीफूड्स
सीफूड्समध्ये मर्करीचं प्रमाण अधिक असतं. इन्टेगरेटिव मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जे लोक आठवड्यातून तीनपेक्षा जास्त वेळा मासे खातात त्यांची स्मरणशक्ती कमी होते.
2) गोड पदार्थ
एका रिसर्चनुसार, खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यास केवळ न्यूरोलॉजिकल समस्याच नाहीतर तुमच्या स्मरणशक्तीवरही प्रभाव पडतो. जास्त गोड खाल्ल्याने अभ्यासात किंवा लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येते.
3) ट्रान्स फॅट
ट्रान्स फॅटचा वापर बऱ्याचदा डुप्लिकेट दही तयार करण्यासाठी, स्नॅक्स फूड आणि बेक्ड फूडमध्ये केला जातो. यामुळे शब्द लक्षात ठेवण्यात अडचण येऊ शकते.
4) चटपटीत पदार्थ
एका रिसर्चनुसार, चटपटीत पदार्थांमुळे तुमच्या हृदयाला समस्या होऊ शकते. त्यासोबतच यातील सोडियमच्या अधिक प्रमाणामुळ स्मरणशक्तीही कमी होऊ शकते.
5) सॅच्युरेटेड फॅट
जर्नल ऑफ न्यूरो सायन्समध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, अधिक प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट खाल्ल्याने स्मरणशक्तीवर प्रभाव पडतो. त्यामुळे जास्त प्रमाणात पिझ्झा आणि पास्तासारखे पदार्थ खाऊ नये.