व्यायामानंतर चुकुनही खाऊ नका हे पदार्थ; उलट वजन वाढेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 08:23 PM2021-05-15T20:23:01+5:302021-05-15T20:23:53+5:30
रोज तुम्ही वर्कआऊट करण्यासाठी तासन् तास घालवता. मग इतकं सगळं करून व्यायामनंतर चूकीचे पदार्थ खाऊन ते वाया का घालवता.
वजन घटवण्यासाठी तुम्ही डाएटिशिअनने दिलेले डाएट अगदी तंतोतंत पाळता. काय खावे? काय खाऊ नये? याचे पथ्यही तुम्ही नियमित पाळता. अगदी कितीही खावेसे वाटले तरी काही पदार्थ खाण्यासाठी तुम्ही तुमच्या तोंडावर नियंत्रण ठेवता.
त्यातच महत्वाची बाब म्हणजे व्यायाम. रोज तुम्ही वर्कआऊट करण्यासाठी तासन् तास घालवता. मग इतकं सगळं करून व्यायामनंतर चूकीचे पदार्थ खाऊन ते वाया का घालवता. तुम्हाला माहितही नसेल की काही पदार्थ तुम्ही व्यायामानंतर खाऊन वजन कमी करण्याऐवजी वाढवता...
केळं
केळ्यामध्ये फार मोठ्याप्रमाणावर कॅलरी आणि कार्बोहायट्रेड असतात. वजन कमी करताना केळं न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यातही तुम्ही व्यायाम करण्यापुर्वी केळं खाल्ल्यास जितका परिणाम होत नाही. त्यापेक्षा जास्त परिणाम व्यायाम केल्यानंतर केळं खाल्ल्यामुळे होतो. यामुळे आपल्या शरीरात असलेले फॅट बर्न होत नाहीत.
खजूर
खजुरात विविध पोषणद्रव्ये असतात जी, आपल्या शरीरासाठी लाभदायक असतात. खजुर खाल्ल्याने आपल्या शरीरातील उर्जेत वाढ होते. पण मंडळींनो खजुरातही कॅलरीज जास्त असल्याने शरीरातील फॅट बर्न करण्याची प्रक्रिया संथ होते.
आंबा
उन्हाळ्यात आंबा न खाणे म्हणजे जणू काही या पदार्थावर आणि परीने आपल्या जीभेवर केलेला जणू अन्यायच पण जर आंबा तुम्ही व्यायामानंतर खात असाल तर तो तुमच्या आरोग्यावरील अन्याय ठरेल. भरपूर लोकांना आंबा फार आवडतो. पण यात कॅलरीज आणि कार्ब मोठ्याप्रमाणावर असतात. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर आंबा खाऊ नका.
खोबरं
नारळाचं खोबरं म्हणजे कोकणी लोकांच्या जेवणातील महत्वाचा भाग आहे. पण जर नारळाचं खोबरं व्यायाम केल्यानंतर खाल्ल्यावर उलट वजन आणखी वाढतं.
अंजीर
अंजीर खाणे हे आपल्या शरिरासाठी लाभदायक असते. अंजीरात कॅलरीजही कमी असतात. सुकवलेले अंजीरही मोठ्याप्रमाणात खाल्ले जातात. पण तरीही अंजीर व्यायामानंतर खाऊ नये असे डॉक्टर मंडळी सांगतात.
मनुका
कार्बोहायट्रेड्स युक्त मनुका आपल्या जेवणात जरूर असल्या पाहिजेत पण व्यायामानंतर मनुका खाणे टाळावे. कारण यामुळे वजन वाढू शकते.