फडफडणाऱ्या डोळ्याकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतो 'हा' गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 02:11 PM2021-07-04T14:11:09+5:302021-07-04T14:14:06+5:30

बरेचदा आपण काही गोष्टींचा अंधश्रद्धाळू प्रमाणे विचार करतो. त्यातीलच एक म्हणजे फडफडणारा डोळा. डोळा फडफडायला लागला म्हणजे काहीतरी अघटीत होणार असा समज ठरलेलाच पण आज जाणून घेऊया डोळा फडफडण्यामागची नेमकी कारणं काय?

Don't ignore the blinking eye, it could be 'this' serious illness | फडफडणाऱ्या डोळ्याकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतो 'हा' गंभीर आजार

फडफडणाऱ्या डोळ्याकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतो 'हा' गंभीर आजार

googlenewsNext

बरेचदा आपण काही गोष्टींचा अंधश्रद्धाळू प्रमाणे विचार करतो. त्यातीलच एक म्हणजे फडफडणारा डोळा. डोळा फडफडायला लागला म्हणजे काहीतरी अघटीत होणार असा समज ठरलेलाच पण आज जाणून घेऊया डोळा फडफडण्यामागची नेमकी कारणं काय?

पापण्यांच्या स्नायूंमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे डोळा मिटतो. दरम्यान हे खालच्या आणि वरच्या दोन्ही पापण्यांमध्ये होऊ शकते. वैद्यकीय भाषेत या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यांना मायोकेमिया, ब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्म असे म्हणतात.

मायोकेमिया
मायोकेमिया स्नायूंच्या सामान्य संकुचिततेमुळे होतो. डोळ्याच्या खालच्या पापण्यांवर याचा जास्त परिणाम होतो. हे अगदी थोड्या वेळासाठी असते आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे यावर मात करता येते.

ब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्म
ब्लेफेरोस्पाज्म आणि हेमीफेशियल स्पाज्म दोन्ही गंभीर आहेत. जे अनुवांशिक कारणांमुळे होतात. या अवस्थेत, रुग्णाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागू शकतो.

डोळे फडफडण्याचं खरं कारण
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मेंदूत किंवा नर्व डिसॉर्डरमुळे एखाद्याचा डोळा फडफडू शकतो. यात बॅन पल्सी, डायस्टोनिया, सर्विकल डायस्टोनिया, मल्टीपल सेलोरोसिस आणि पार्किन्सनसारखे विकार समाविष्ट आहेत. तर जीवनशैलीतील काही त्रुटींमुळे लोकांनाही अशा समस्या येऊ शकतात.

डोळे फडफडण्याची इतर कारणं

आय स्ट्रेन- जर तुम्ही पूर्ण दिवस लॅपटॉप, टीव्ही किंवा मोबाईलच्या स्क्रिनसमोर असाल तर आय स्ट्रेनची समस्या उद्भवू शकते. अशावेळी ड़ोळ्यांना आराम देणं गरजेचं आहे. 

अपुरी झोप- डोळा फडफडण्यामागे अपुरी झोप हे देखील एक कारण असू शकतं. डॉक्टर म्हणण्याप्रमाणे, व्यक्तीने कमीत कमी 7-9 तासांची झोप घेतली पाहिजे.  त्यापेक्षा कमी झोप घेतलात तर डोळ्यांवर ताण येतो. 

ताण- तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ताणतणावामुळेही लोकांना डोळा फडफडण्याची तक्रार उद्भवू शकते. त्यामुळे ताणतणाव कमी होईल अशा गोष्टींवर भर द्यावा

Web Title: Don't ignore the blinking eye, it could be 'this' serious illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.