पावसाळ्यात डोळ्यांच्या 'या' तीन समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, परीणाम आहेत अतिगंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 12:49 PM2021-07-16T12:49:30+5:302021-07-16T12:50:07+5:30

डोळे शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव आहेत. थोडासा निष्काळजीपणा केल्यास डोळ्याच्या संसर्गाचा धोका असतो. अशा तीन डोळ्यांच्या समस्या आहेत ज्यांचा पावसाळ्यात सामना करावाच लागतो. त्यापासून बचाव कसा करावा हे आपण पाहुया.

Don't ignore these 'three' eye problems in the rainy season, the consequences are very serious | पावसाळ्यात डोळ्यांच्या 'या' तीन समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, परीणाम आहेत अतिगंभीर

पावसाळ्यात डोळ्यांच्या 'या' तीन समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, परीणाम आहेत अतिगंभीर

Next

पाऊस पडताच रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. वातावरणातील ओलाव्यामुळे, हानिकारक जीवाणू आणि शरीरास नुकसान करणारे विषाणू सक्रिय होतात. याशिवाय पावसात चहूबाजूंना हिरव्या गवत आणि पाण्यामुळे बारीक किडे अधिक प्रमाणात आढळतात. अशा परिस्थितीत त्यांचा धोका आपल्या शरीरावर वाढतो. विशेषत: शरीराच्या नाजूक भागावर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. डोळेदेखील शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव आहेत. थोडासा निष्काळजीपणा केल्यास डोळ्याच्या संसर्गाचा धोका असतो. अशा तीन डोळ्यांच्या समस्या आहेत ज्यांचा पावसाळ्यात सामना करावाच लागतो. त्यापासून बचाव कसा करावा हे आपण पाहुया. याची माहिती डॉ. रमन कुमार यांनी ओन्लीमायहेल्थ या वेबसाईटला दिली आहे.

डोळे येणे
डोळ्यातील पांढरे होणारे भाग आणि पापण्यातील अंतर्गत भाग याला कंजेक्टिवा म्हणतात. डोळ्याच्या या भागामध्ये जळजळ होणे, लालसरपणा आणि सूज येणे याला कंजेक्टिव्हायटीस म्हणजेच डोळे येणे असे म्हणतात. पावसातील बॅक्टेरिया डोळ्यांनाही संसर्गित करतात, यामुळे कंजेक्टिव्हायटीस आजार होतो. हे टाळण्यासाठी, डोळे दिवसातून बर्‍याचदा थंड पाण्याने धुवावेत.

डोळे कोरडे होणे
पावसात डोळे कोरडे होण्याचीही समस्या दिसून येते. हा रोग केवळ पावसाळ्यातच उद्भवतो. डोळ्यां मध्ये जळजळ, चुरचुरणे आणि वारंवार पाणी येणे यासारख्या समस्या होतात. आहारात बदल करुन डोळ्याच्या कोरडेपणाच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.

आईस्टाई
पावसात संक्रमणाचा धोका जास्त असल्याने वारंवार डोळ्यांना स्पर्श करणे टाळले पाहिजे. असे बर्‍याचदा पाहिले गेले आहे की अस्वच्छ हातांना स्पर्श केल्याने डोळ्यांचा संसर्ग होतो. पावसाळ्यातही बर्‍याचदा डोळ्यांना आईस्टाई ॉआल्याचा त्रास होतो. पापणीभोवती डोळ्याची सूज किंवा उभारी येणे म्हणजे आईस्टाई. हा आजार डोळ्यांना अस्वच्छ हातांना स्पर्श केल्याने देखील होतो.

पावसाळ्यात अशा प्रकारे डोळ्यांची काळजी घ्या

  • न धुता आपल्या हातांनी डोळ्यांना कधीही स्पर्श करु नका.
  • आपले वापरलेले टॉवेल रुमाल आणि साबण कुणालाही वापरण्यास देऊ नका.
  •  धूर-धूळ प्रदूषण आणि तीव्र सूर्यकिरणे आणि प्रकाश यांच्यापासून डोळ्यांचे संरक्षण करा.
  •  जेव्हा आपण घराबाहेर पडता तेव्हा चांगल्या प्रतीचे सनग्लासेस वापरा.
  • कंजेक्टिव्हायटीस संसर्गाच्या वेळी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.

Web Title: Don't ignore these 'three' eye problems in the rainy season, the consequences are very serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.