तोंड आल्यावर दुर्लक्ष करू नका, या मोठ्या आजारचं असू शकतं लक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 08:06 PM2021-05-10T20:06:10+5:302021-05-10T20:23:08+5:30
तुम्हाला जर तोंड येत असेल किंवा तोंडात फोड येत असेल तर ही एक भयानक आजाराची लक्षणे असू शकतात.
तोंड येणं किंवा तोंडात फोड येणं हे अनेक कारणांमुळे होऊ शकत. जसे पित्त, पोटांचे आजार, बद्धकोष्ठता, शरीरातील पाण्याची कमतरता. अनेकांचा असा समज असतो की हे नेहमीच होत असतं. त्यामुळे यात विशेष लक्ष देण्याची गरज नसते. पण सावधान! जर तुम्ही जर याकडे दुर्लक्ष करत असाल तर हे चांगलंच महाग पडू शकतं. नाक आणि गळ्याचे डॉक्टर डॉ. ब्रायन बर्क यांनी असे मत नोंदवले आहे की समजा तुम्हाला तोंडात फोड येत आणि बराच काळ बरं होत नसेल तर हे एका मोठ्या आजाराची लक्षण ठरू शकते. हा आजार म्हणजे ओरल कॅन्सर. विशेषत: या आजाराला स्क्वेमस कॅन्सर असे म्हटले जाते.
तोडांत फोड आल्यावर आपण थातूरमातूर औषधी उपचार करतो आणि या दुखण्याकडे साफ दुर्लक्ष करतो.
- समजा या फोडीमधून रक्त येत असेल
- ही फोड सतत दुखतं असेल
- तसेच दीर्घकाळ बरी होत नसेल
तर याचा गांभीर्याने विचार करा. कारण हा सहज न कळणारा स्क्वेमस कॅन्सर असु शकतो. बरेचदा काही ओरल कॅन्सर सहज कळत नाहीत, कारण कधी कधी हे कॅन्सर जिभ अथवा दातांच्या मागे लपलेले असू शकतात.
आम्ही तुम्हाला आणखी काही लक्षण सांगणार आहोत की जी या कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. ही लक्षणे आढळली तर अजिबात वेळ न दवडता त्वरित डॉक्टरकडे जा.
१. तोंडात बराचवेळ दुखणे
२. तोंडातल्या फोडीतून दिर्घकाळ किंवा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ रक्त येणे
३. तोंडातील एखाद्या भागाचा रंग बदलणे
४. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ घशात सुज येणे
५.गालांमध्ये गाठ तयार होणे व गाल बराच वेळासाठी सुजणे
६. जीभ किंवा तोंडाचा इतर काही भाग सुन्न होणे
७. घशात दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ जड वाटणे
दोस्तांनो डॉ. बर्क यांच्या मते हा कॅन्सर एक वर्ष इतका काळ त्रास देऊ शकतो. पण योग्य उपचारांनंतर हा कॅन्सर बराही होऊ शकतो.