फक्त वजन कमी करण्यासाठी स्प्राऊट्स खाताय; मग 'हे' वाचून व्हाल थक्क...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 08:22 PM2021-05-20T20:22:18+5:302021-05-20T20:23:12+5:30

स्प्राऊट्स म्हटलं की वजन कमी करणं इतकंच डोळ्यासमोर येतं. पण स्प्राऊट्स खाण्याचे असे फायदे आहेत जे तुम्हाला माहितही नसतील. ...

don't just eat sprouts to lose weight; other benefits will shock you | फक्त वजन कमी करण्यासाठी स्प्राऊट्स खाताय; मग 'हे' वाचून व्हाल थक्क...

फक्त वजन कमी करण्यासाठी स्प्राऊट्स खाताय; मग 'हे' वाचून व्हाल थक्क...

googlenewsNext

स्प्राऊट्स म्हटलं की वजन कमी करणं इतकंच डोळ्यासमोर येतं. पण स्प्राऊट्स खाण्याचे असे फायदे आहेत जे तुम्हाला माहितही नसतील. स्प्राऊट्स व्हिटॅमिन सी, के, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फॉलेट आणि अँटीऑक्सिडंटयुक्त असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे स्प्राऊट्स प्रोटीनचा खजिना असतात. डाएटिशयन वाणी अग्रवालने ओन्ली माय हेल्थशी बोलताना स्प्राऊटचे वजन घटवण्याव्यतिरिक्त फायदे सांगितले आहेत.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते
स्प्राऊट्समध्ये फायबर आणि प्रोटीन असतात, जे पचनक्षमता वाढवतात. यामुळे तुमच्या शरीरातील शर्करेचा स्तर कमी होतो. पर्यायाने तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते. डायबेटीजच्या रुग्णांसाठी स्प्राऊट वरदान आहे. तसेच मोड आलेल्या मुगांमध्ये स्टार्चचे प्रमाण न मोड आलेल्या मुगांपेक्षा कमी असते. त्यामुळे कार्बोहायट्रेडही कमी असतात.

हृदयरोग दूर ठेवते
स्प्राऊटमध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते. हे दोन्ही घटक हृदयाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. त्याचबरोबर स्प्राऊट्समध्ये चांगले कॉलेस्ट्रॉल अधिक असते जे हृदयासाठी फायदेशीर असते. स्प्राऊट खाल्ल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो.

अँटीऑक्सिडंट्सने भरपूर
स्प्राऊट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स फार मोठ्याप्रमाणावर असतात. त्यामुळे शरीराच्या आतल्या भागात कुठे सुज आली असेल तर ती कमी होते. त्याचबरोबर तुम्ही अनेक रोगांपासून सुरक्षित राहता.

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर
स्प्राऊटमध्ये तुमच्या शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन्स असतात. यात फॉलेट असते जे लाल रक्तपेशी वाढवते. त्याचबरोबर शरीरातील हार्मोन्सवरही नियंत्रण ठेवते. यामधले व्हिटॅमिन्स मेटाबॉलिजम वाढवतात. व्हिटॅमिन्स केसांच्या वाढीसाठीही उपयुक्त असतात. फॉस्फरसमुळे सांध्यांचे दुखणे कमी होते.
 

Web Title: don't just eat sprouts to lose weight; other benefits will shock you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.