काही केल्या पोटावरील चरबी कमी होत नाही? दुपारच्या जेवणावेळी करू नका या ३ चुका!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 12:13 PM2024-06-01T12:13:59+5:302024-06-01T12:14:23+5:30
How to reduce belly fat : ऑफिसमध्ये जेवण करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही बाहेर आलेलं पोट कमी करू शकता.
How to reduce belly fat : बेली फॅट म्हणजे पोट वाढण्याची समस्या आजकाल जास्तीत जास्त लोकांना होत आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे लाइटस्टाईलमध्ये झालेला बदल. वेळेवर जेवण न करणे, चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचाल कमी करणे या कारणांमुळे ही समस्या होते. ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसते. जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्याने मेटाबॉलिज्म स्लो होतं, ज्यामुळे अन्न चरबीमध्ये बदलतं. अशात ऑफिसमध्ये जेवण करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही बाहेर आलेलं पोट कमी करू शकता. दुपारच्या जेवणावेळी या तीन गोष्टी टाळाल तर तुम्हाला नक्कीच फायदा दिसेल.
डेस्कवर बसून जेऊ नका
दुपारच्या जेवणावेळी काही चुका केल्या तर तुमच्या पोटावरील चरबी वाढू शकते. जर तुम्ही तुमच्या डेस्कवर बसूनच जेवण करत असाल तर हे लगेच बंद करा. अशाने तुमच्या शरीरात चरबीही वाढेल आणि आहारातील पोषक तत्वही शरीराला मिळणार नाहीत. डेस्कवर बसून जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा तुमचं लक्ष गोष्टींवरही जातं. तुमचं लक्ष जेवणावर हवं. तेव्हा ते चांगलं पचेल आणि चरबी वाढणार नाही.
जेवल्यावर लगेच काम
जेवण केल्यावर तुम्ही लगेच आपल्या कामात व्यस्त होत असाल तर लगेच बंद करा. जेवण केल्यावर लगेच झोपणं किंवा बसून राहिल्याने स्ट्रेस हॉर्मोन वाढतात. ज्याचा मेटाबॉलिज्मवर वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे जेवण झाल्यावर किमान 5 ते 10 मिनिटे चालावं.
सोडा कॉफी पिता?
बऱ्याच लोकांना सवय असते की, ते जेवण झाल्यावर लगेच कॉफी किंवा सोड्याचं सेवन करतात. पण असं केल्याने तुमचं वजन वाढू शकतं. कारण सोड्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर असतं जे कॅलरी वाढवण्याचं काम करतं. यामुळे तुमचं डायजेशनही बिघडतं आणि पोटावर चरबी वाढते.