लसणाचं सेवन करताना तुम्ही सुद्धा 'ही' चूक करता का? काहीच मिळणार नाही फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 10:27 AM2024-06-01T10:27:00+5:302024-06-01T10:27:36+5:30
Right way to eat Garlic : जास्तीत जास्त लोक लसणाच्या कळ्या सोलतात आणि ठेचून किंवा तुकडे करून भाजीमध्ये लगेच टाकतात. पण असं केल्याने तुम्हाला लसणाचे फायदे मिळत नसल्याचं एक्सपर्ट सांगतात.
Right way to eat Garlic : काही मोजके जर पदार्थ सोडले तर भारतात कांदा आणि लसणाशिवाय एकही पदार्थ बनत नाही. वेगवेगळ्या भाज्यांमध्ये लसणाचा वापर केला जातो. कारण लसणाने पदार्थांची टेस्टही वाढते आणि सोबत आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. जास्तीत जास्त लोक लसणाच्या कळ्या सोलतात आणि ठेचून किंवा तुकडे करून भाजीमध्ये लगेच टाकतात. पण असं केल्याने तुम्हाला लसणाचे फायदे मिळत नसल्याचं एक्सपर्ट सांगतात.
डायटिशिअन दीपशिखा जैन यांनी असं का करू नये याबाबत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, "लसूण कापल्या किंवा बारीक केल्यावर लगेच खाऊ नये. असं केल्याने तुम्हाला यातील फायदे किंवा पोषक तत्व मिळत नाही. लसूण कापल्यानंतर तो कमीत कमी १० ते १५ मिनिटे तसाच ठेवा. एलिसिन नावाचं तत्व लसणांमध्ये असतं जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतं. सोबतच अस्थमाही कमी होतो. लसूण बारीक केल्यावर किंवा कापून लगेच खाल्ल्यावर त्यातील पोषक तत्व शरीरात योग्य पद्धतीने अवशोषित होत नाहीत. त्यातील फायदे मिळवण्यासाठी लसूण कापल्यावर १० ते १५ मिनिटे तसा ठेवावा. नंतर त्याचा वापर करावा".
लसूण खाण्याचे फायदे
लसूण आणि गूळ सोबत खाल्ला तर तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. लसणामध्ये असलेले तत्व मेटाबॉलिज्म बूस्ट करतात. यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रोल कमी होतं. तसेच रक्ताची कमतरताही दूर होते. लसणामुळे हीमोग्लोबिन लेव्हल वाढण्यास मदत मिळते.
लसणांमध्ये आढळणारं एलिसिन नावाचं तत्व एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रोलच्या ऑक्सिकरणाला रोखतं. यामुळे कोलेस्ट्रोलची लेव्हल कमी होते आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं.
कच्च्या लसणाचा आहारात समावेश केल्याने पचनासंबंधी समस्या दूर होतात. यामुळे आतड्यांना फायदा मिळतो आणि सूजही कमी होते. त्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थही नष्ट होतात.