तुम्हीही बदामाची साल फेकता का? जाणून घ्या कसा करावा त्यांचा वापर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 10:09 AM2024-08-08T10:09:29+5:302024-08-08T10:10:40+5:30
Uses of almond peel : या सालीमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. अशात आज आम्ही तुम्हाला बदामाच्या सालीचा वापर कसा करू शकाल हे सांगणार आहोत.
Uses of almond peel : भिजवलेले बदाम भरपूर लोक खातात. बदाम खात असताना त्यांची साल जास्तीत जास्त लोक फेकून देतात. पण असं करणं चुकीचं ठरू शकतं. कारण बदामाच्या सालीमध्येही अनेक पोषक तत्व असतात. या सालीमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. अशात आज आम्ही तुम्हाला बदामाच्या सालीचा वापर कसा करू शकाल हे सांगणार आहोत.
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम साल काढून खाणं ही कॉमन पद्धत आहे. मात्र हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, बदामाची साल न काढता खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. कारण या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. पण नेहमीच बदाम सालीसोबत किंवा सालीशिवाय खाण्याचा सल्ला दिला जातो कारण यात फायटिक अॅसिड नावाचं रसायन असतं. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. पण याचे काही फायदेही आहेत. तेच आज जाणून घेऊ.
पोट साफ होण्यास मदत
बदामाच्या सालीमध्ये भरपूर फायबर असतं. जे आतड्यांमध्ये चांगेल बॅक्टेरिया वाढवतात आणि यात फ्लेवोनोइड्स असतात. बदामाच्या सालीचं तुम्ही अळशी, खरबूजाच्या बीया आणि मिश्रीसोबत मिक्स करून दुधासोबत सेवन करू शकता. याने पोट साफ होण्यास मदत मिळेल.
हेअरमास्क करा तयार
बदामाच्या सालीचा हेअरमास्क तयार करण्यासाठी अर्धा कप बदामाची साल, १ अंड, १ मोठा चमचा खोबऱ्याचं तेल, २ मोठे चमचे एलो जेल आणि मध मिक्स करा. हे मिश्रण चाळणीने गाळून केसांवर लावा. यात व्हिटॅमिन ई भरपूर असतं. जे केसांना पोषण देतं.
स्नॅक्स म्हणून खाऊ शकता
१ कप बदामाची साल घ्या, ती चांगली धुवा आणि उन्हात वाळत घाला. यानंतर एक वाटा घ्या त्यात एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल, एक चमचा लसूण पावडर, एक चमचा कांद्याची पावडर, टेस्टनुसार मीठ आणि काळी मिरे टाका. या गोष्टी चांगल्या मिक्स करा आणि मग यात वाळलेली बदामाची साल टाका. आता याना १० ते १५ मिनिटे बेक करा. हे मिश्रण कुरकुरीत झाल्यावर एका डब्यात स्टोर करा. हे तुम्ही कधीही खाऊ शकता.
बदाम खाण्याचे योग्य वेळ
झोपण्याआधी फायदेशीर
झोपण्यापूर्वी मुठभर बदाम खाल तर याने तुम्हाला अनेक फायदे होतील. बदामात मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे झोप आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. रात्री बदाम खाल तर मॅग्नेशिअममुळे ब्लड शुगरही कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते. डायबिटीसचे रूग्ण असाल तर थोडे बदाम खाऊन झोपावे.
तसेच रात्री बदाम भिजवून ठेवून सकाळी खाल तर यानेही शरीराला आश्चर्यकारक फायदे होतात. बदामाच्या सालीमुळे अनेकजण बदाम पचवू शकत नाही. त्यामुळे अनोशा पोटी सालीसह बदाम खाऊ नये. तुम्ही एक ग्लास दुधात बदाम मिश्रित करूनही सेवन करू शकता. बदामाच्या सालीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे सालीसह बदाम खाणंही फायदेशीर आहे. फक्त अनोशा पोटी खाऊ नका.