बटाट्याची किंवा केळीची साल फेकून द्याल तर पस्तावाल, अनेक आजारांवर गुणकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 08:31 PM2021-06-03T20:31:46+5:302021-06-03T20:32:04+5:30

आपण फळे खाल्ल्यानंतर फळांच्या साली फेकुन देतो. मात्र, याच फळांच्या साली बहुगुणी असतात. त्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या सालींमुळे आपण अनेक रोगांपासून दूरही राहु शकतो.

Don't throw potato and banana's peel, very beneficial for health | बटाट्याची किंवा केळीची साल फेकून द्याल तर पस्तावाल, अनेक आजारांवर गुणकारी

बटाट्याची किंवा केळीची साल फेकून द्याल तर पस्तावाल, अनेक आजारांवर गुणकारी

googlenewsNext

आपण फळे खाल्ल्यानंतर फळांच्या साली फेकुन देतो. मात्र, याच फळांच्या साली बहुगुणी असतात. त्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या सालींमुळे आपण अनेक रोगांपासून दूरही राहु शकतो.  तुम्ही बटाट्याच्या आणि केळ्याच्या साली फेकुन देतच असालच. मात्र या सालींचे फायदे अनेक आहेत.
बटाट्याच्या सालीत कॅल्शियम, व्हिटामिन सी आणि बी कॉम्पलेक्ससोबतच लोह देखील भरपूर असते. या सालीतील हेच घटक शरीरातील अनेक कमतरता दूर करतात. त्यामुळे अनेक आजार आपल्यापासू दूर राहतात. वजन कमी करण्यासाठी आणि उच्च रक्तदाबासारख्या अनेक व्याधींवर बटाट्याची साल फायदेशीर आहे. बटाट्याच्या सालीत कॅल्शियम आणि व्हिटामिन असल्याने, त्याच्या सेवनाने हाडं मजबुत होतात. व्हिटामिन बीमुळे शरीराला ताकद आणि दिवसभराची ऊर्जा मिळते. त्यामुळे शक्य तेवढ्या वेळा बटाटा हा सालीसकट खाण्याचा प्रयत्न करावा.
केळीची साल प्रचंड फायदेशीर आहे. केळीच्या सालीचा आहारात समावेश करण्यासाठी आपण सर्वात आधी केळीची साल स्वच्छ धुवून घ्या. एक ग्लास पाणी गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये केळीची साल घाला. दहा मिनिटे हे पाणी चांगले उकळा आणि नंतर हे पाणी प्या. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. आपण केळीची साल मिक्सरमध्ये बारीक करून देखील आहारात वापरू शकतो. दररोज सकाळी केळीच्या सालीची पावडर पाण्यात मिक्स करून प्यायल्याने आपले वजन कमी होते.यामुळे केळीच्या सालचा आहारात समावेश  केला पाहिजे. बटाट्यात मोठ्या प्रमाणात फायबर घटक असल्याने आपली पचनशक्ती देखील चांगली राहते. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या देखील नाहीशी होते.  बटाट्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ती भरून निघते.

Web Title: Don't throw potato and banana's peel, very beneficial for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.