कोरोना महामारी संपलेली नाही उलट भविष्यात धारण करेल मोठे स्वरुप, तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 05:56 PM2021-12-26T17:56:16+5:302021-12-26T18:00:52+5:30

कोरोना महामारी अजून संपलेली नाही आणि येत्या काही दिवसांत ती एंडेमिक स्टेजवरही जाऊ शकते. एंडेमिक अशी स्टेज आहे जेव्हा व्हायरस एखाद्या ठिकाणी कायम राहतो.

dr angelique coetzee about omicron | कोरोना महामारी संपलेली नाही उलट भविष्यात धारण करेल मोठे स्वरुप, तज्ज्ञांचा इशारा

कोरोना महामारी संपलेली नाही उलट भविष्यात धारण करेल मोठे स्वरुप, तज्ज्ञांचा इशारा

Next

Omicron व्हेरिएंटची प्रकरणं भारतात वाढताना दिसतायत. दक्षिण आफ्रिकेप्रमाणे, लोकांमध्ये याचा सौम्य संसर्ग दिसून येईल, असा दावा डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांनी केला आहे. डॉ.कोएत्झी यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंट प्रथम ओळखला होता. त्यांनी असंही सांगितलं की, सध्याच्या लसींमुळे संसर्गावर नक्कीच नियंत्रण येईल, परंतु जे लोक लस घेत नाहीत त्यांना याचा १०० टक्के धोका आहे.

डॉ. कोएत्झी यांनी सांगितलं की, 'ओमायक्रॉन, लसीकरण झालेल्या किंवा पूर्वी संसर्ग झालेल्या लोकांमध्ये कमी पसरेल. तर जे लस घेत नाहीत ते त्यांना याचा धोका अधिक आहे.' त्या पुढे म्हणाल्या की, कोरोना महामारी अजून संपलेली नाही आणि येत्या काही दिवसांत ती एंडेमिक स्टेजवरही जाऊ शकते. एंडेमिक अशी स्टेज आहे जेव्हा व्हायरस एखाद्या ठिकाणी कायम राहतो.

ओमायक्रॉन व्हेरिएंट आता अंतिम टप्प्यात आहे असं काही तज्ज्ञांचं मत आहे. मात्र डॉ. कोएत्झी हे या तज्ज्ञांच्या मताशी सहमत नाहीत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारपर्यंत भारतात ओमायक्रॉन संसर्गाची एकूण ४०० हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. त्यापैकी ११५ रुग्ण बरे झाले आहेत. डॉ. कोएत्झी म्हणाले की, कोणताही व्हायरस जो नियंत्रणाबाहेर जातो तो माणसांसाठी धोकादायकच असतो.

दरम्यान देशभरात देखील दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. देशातील एकूण १७ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. तर आता संपूर्ण देशभरात संपूर्ण देशभरात ओमायक्रॉमन रूग्णांची संख्या ४२२ वर जाऊन पोहोचली आहे. ४२२ पैकी १०८ ओमायक्रॉनची प्रकरणं ही एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर गुजरात आणि तेलंगणामध्ये रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: dr angelique coetzee about omicron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.