जपानी लोक जास्त आयुष्य जगतात, पण काय खाऊन जगतात हे माहीत नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 01:24 PM2024-01-25T13:24:51+5:302024-01-25T13:25:28+5:30
भारतातील प्रसिद्ध डॉक्टर सौरभ सेठी यांनी सांगितलं की, जपानमध्ये जास्त जीवन जगण्यासाठी लोक काय खातात.
जपानमधील लोक 100 वर्ष निरोगी जगतात हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. जपानमध्ये एक ठिकाण आहे जिथे हे लोक इतकं जगतात. जास्त आयुष्य जगण्यासाठी तसं तर काही औषध नाही. पण येथील लोक आपल्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करतात ज्यामुळे त्यांना शक्ती मिळते आणि आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.
100 वर्ष जगण्यासाठी काय करावं लागतं? असा प्रश्न अनेक लोकांना पडत असेल. तर उत्तर तुमच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये आहे. ज्यांमुळे लोकांचं वय कमी होत चाललं आहे.
आजकाल लोक सरासरी 60 वयापर्यंतच जगत आहेत. पण जगात अशीही काही ठिकाणं आहेत जिथे लोक 100 वर्ष जगतात. यातील एक देश जपान आहे. जपानसहीत अनेक देशांमध्ये काही ठिकाणांना 'ब्लू झोन' च्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. याची सगळ्यात खास बाब म्हणजे इथे राहणारे लोक 100 वर्षापेक्षाजास्त जगतात.
मुळात जास्त जीवन जगण्यासाठी डाएट आणि फिजिकल अॅक्टिविटीची काळजी घेतली पाहिजे. भारतातील प्रसिद्ध डॉक्टर सौरभ सेठी यांनी सांगितलं की, जपानमध्ये जास्त जीवन जगण्यासाठी लोक काय खातात.
मिशो सूप
मिशो सूप फर्मेटेड सोयापासून बनवलं जातं. याची खास बाब म्हणजे यातून तुम्हाला प्रोबिओटिक तत्व भरपूर मिळतात. याच्या सेवनाने पोट आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते.
रताळे
तुम्ही हे कंदमूळ नक्कीच पाहिलं असेल आणि अनेकदा खाल्लंही असेल. डॉक्टरांनुसार, यात भरपूर प्रमाणात anthocyanin नावाचे अॅंटीऑक्सिडेंट असतात. तसेच यात अॅंटी-कॅन्सर, अॅंटी डायबिटीक, अॅंटी इन्फ्लामेटरी, अॅंटी मायक्रोबियल आणि अॅंटी ओबेसिटी गुण असतात.
डायकोन मूळा
सामान्य मुळ्यापेक्षा हा मूळा जरा वेगळा असतो. यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं. याच्या नियमित सेवनाने इम्यून सिस्टीम मजबूत होण्यास मदत मिळते. इम्यून पॉवर मजबूत झाल्याने तुम्हाला संक्रमण आणि आजारांसोबत लढण्याची शक्ती मिळते.
समुद्री शेवाळ
समुद्री शेवाळात व्हिटॅमिन ए, सी, आणि ई, कॅरोटीनॉयड आणि फ्लेवोनोइड सारखे अॅंटी-ऑक्सीडेंट असतात. हे ऑक्सिडेंट तुमच्या शरीरातील सेल्स डॅमेज होण्यापासून वाचवतात. त्याशिवाय यात सगळे मिनरल्स आढळतात जे शरीराला चांगलं काम करण्यासाठी गरजेचे असतात.