डॉ. श्रीराम नेने यांनी इम्यूनिटी वाढवणाऱ्या फूड्सची दिली माहिती, रोजच्या आहारात करा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 10:18 AM2024-08-16T10:18:54+5:302024-08-16T10:19:18+5:30
Immunity Booster Foods : या सुपरफूड्सचा रोजच्या आहारात समावेश केल्याने आरोग्य तर चांगलं राहतंच सोबतच अनेक आजारांपासून सुटकाही मिळते. जर तुम्हालाही तुमची इम्यूनिटी मजबूत करायची असेल तर हे उपाय ट्राय करू शकता.
Immunity Booster Foods : प्रसिद्ध डॉक्टर श्रीराम नेने जे एक कार्डियोलॉजिस्ट आहेत, त्यांनी नुकताच इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट करून इम्यूनिटी वाढवणाऱ्या सुपरफूड्सची माहिती दिली आहे. या सुपरफूड्सचा रोजच्या आहारात समावेश केल्याने आरोग्य तर चांगलं राहतंच सोबतच अनेक आजारांपासून सुटकाही मिळते. जर तुम्हालाही तुमची इम्यूनिटी मजबूत करायची असेल तर हे उपाय ट्राय करू शकता.
डॉक्टर नेने यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, "Six superfoods, one goal: a stronger you," म्हणजे सहा असे सुपरफूड्स जे तुमची इम्यूनिटी बूस्ट करू शकतात.
१) हळद
हळदीमध्ये आढळणारं करक्यूमिन हे तत्व एक शक्तीशाली अॅंटी-ऑक्सिडेंट आहे. जे शरीरात आत वाढलेली सूज कमी करण्यास मदत करतं. तसेच इम्यूनिटी मजबूत करण्यासही मदत करतं.
२) आले
आल्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आणि चहामध्येही केला जातो. यात आढळणारं तत्व जिंजरोलमुळे सूज कमी होते आणि इम्यूनिटी बूस्ट होते.
३) आंबट फळं
आंबट फळं चवीला चांगले लागतातच, सोबतच यांचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. जे इम्यूनिटी मजबूत करण्यास मदत करतं.
४) दही
भरपूर लोक नियमितपणे दही खातात. दह्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. दह्याने इम्यूनिटी बूस्ट होण्यासही मदत मिळते. तसेच पोटाचं आरोग्य चांगलं राहतं.
५) लाल शिमला मिरची
लाल शिमला मिरचीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्यूनिटी बूस्ट होण्यास मदत मिळते. तसेच अनेक इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
६) पालक
पालक भाजी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यात व्हिटॅमिन्स, खनिज आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे आपली इम्यूनिटी मजबूत करण्यास मदत करतात.
आजकाल इम्यूनिटी मजबूत ठेवणं फार गरजेचं झालं आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टींमुळे लोक आजारी पडतात. अशात या सुपरफूड्सचा आहारात वेगवेगळ्या पद्धतीने समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत मिळेल.