डॉक्टर श्रीराम नेने यांनी सांगितलं सकाळी नाश्त्यात काय खाऊ नये, वाचाल तर रहाल फायद्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 04:45 PM2024-07-29T16:45:20+5:302024-07-29T16:46:20+5:30
Morning Breakfast : नाश्त्याला तुम्ही चुकीच्या गोष्टींचं सेवन केलं तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. चुकीच्या नाश्त्यामुळे लठ्ठपणा वाढतो, पोट बिघडतं आणि हृदयारोगाचा धोकाही वाढतो.
Morning Breakfast : सकाळचा नाश्ता हा आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. कारण या नाश्त्यामुळेच तुम्हाला दिवसाची सुरूवात एनर्जीने करता येते. पण सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही काय खाता हेही तेवढंच महत्वाचं आहे. जर नाश्त्याला तुम्ही चुकीच्या गोष्टींचं सेवन केलं तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. चुकीच्या नाश्त्यामुळे लठ्ठपणा वाढतो, पोट बिघडतं आणि हृदयारोगाचा धोकाही वाढतो.
अशात माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) चे पती डॉक्टर श्रीराम नेने (Dr. Sriram Nene) यांनी अशा काही फूड्सबाबत सांगितलं आहे जे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात. डॉक्टर नेने यांनी सकाळी नाश्त्यात काय खाऊ नये याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सकाळी नाश्त्यात काय खाऊ नये?
व्हाईट ब्रेड
व्हाईट ब्रेडमध्ये प्रोसेस्ड व्हाईट फ्लॉर असतं जे नाश्त्यात खाणं फार चुकीचं आहे. व्हाईट ब्रेड नियमितपणे नाश्त्यात सेवन केलं तर लठ्ठपणा, पोटासंबंधी समस्या, हृदयरोग आणि डायबिटीसचा धोका वाढतो. त्याशिवाय ब्रेडमध्ये अॅडेड शुगरही खूप असते जी आरोग्यासाठी नुकसानकारक असते.
शुगरी सीरियल्स
शुगरी सीरियल्सचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाणही जास्त असतं आणि हे स्वीट सीरियल्स सकाळी नाश्त्यात खाल्ले तर हाय ब्लड लिपिड लेव्हल आणि हृदयाच्या समस्या वाढू शकतात.
फ्रूट ज्यूस
सकाळी नाश्त्यात जर रिकाम्या पोटी फ्रूट ज्यूसचं सेवन कराल तर याने शुगर स्पाइक, दातांच्या समस्या आणि पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. ताज्या फळांमध्ये फायबर भरपूर असतं आणि डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत करतं. ताजी फळं खाऊ शकता, पण फळांचा ज्यूस सेवन करू नका.
प्रोसेस्ड मीट
नाश्त्यामध्ये प्रोसेस्ड मीटचं सेवन करणं आरोग्यासाठी फार चुकीचं मानलं जातं. प्रोसेस्ड मीटचं नाश्त्याला सेवन कराल तर याने हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग आणि पोटासंबंधी समस्यांचा धोका वाढतो.
स्वीटेंड योगर्ट
आहारात स्वीटेंड शुगरचा वापर करणं नुकसानकारक ठरतं. सकाळी रिकाम्या पोटी स्वीटेंड योगर्ट न खाण्याचा सल्ला दिला जातो. स्वीटेंड योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स आणि गुड कॅल्शिअम असतात, पण हे रिकाम्या पोटी खाल्ल्याने गुड बॅक्टेरिया पोटातील अॅसिडमुळे नष्ट होतात. त्यामुळे नाश्त्यात स्वीटेंड शुगर खाऊ नये.