उन्हाळ्यात आइस्ड टी चं करा सेवन, वजन कमी करण्यासोबतच होतील हे फायदे! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 10:16 AM2019-03-26T10:16:54+5:302019-03-26T10:20:54+5:30

तुम्ही लेमन टी, ग्रीन टी, ब्लॅक टी अनेकदा सेवन केली असेल. मात्र आइस्ड टी चे कधी सेवन केलं का? यात चहा थंड करून किंवा त्यात बर्फ मिश्रित करून तयार केला जातो.

Drink iced tea in summer it will decrease body weight | उन्हाळ्यात आइस्ड टी चं करा सेवन, वजन कमी करण्यासोबतच होतील हे फायदे! 

उन्हाळ्यात आइस्ड टी चं करा सेवन, वजन कमी करण्यासोबतच होतील हे फायदे! 

Next

तुम्ही लेमन टी, ग्रीन टी, ब्लॅक टी अनेकदा सेवन केली असेल. मात्र आइस्ड टी चे कधी सेवन केलं का? यात चहा थंड करून किंवा त्यात बर्फ मिश्रित करून तयार केला जातो. सामान्यपणे आइस्ड टी ब्लॅक किंवा ग्रीन टी पासून तयार केली जाते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हर्बल टी ला सुद्धा बर्फासोबत तयार करून आइस्ड टी तयार करू शकता. आइस्ड टी चा स्वाद वाढवण्यासाठी त्यात तुम्ही लिंबू, चेरी, नारंगी फ्लेवर टाकू शकता. तसेच या आइस्ड टी चे आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात.  

पोषक तत्त्व

सामान्य आइस्ड ब्लॅक टीमध्ये पोटॅशिअम, डायटरी फायबर, मॅग्नेशिअम, कॅफीन, फ्लोराइड, फ्लेवोनॉइड आणि इतरही काही अ‍ॅंन्टी-ऑक्सिडेंट तत्व असतात. तर दुसऱ्या प्रकारच्या आइस्ड टी जसे की, ग्रीन टी किंवा हर्बल टी मध्ये वेगवेगळे पोषक तत्व असतात. 

कसा कराल तयार?

आइस्ड टी तयार करणे फारच सोपं काम आहे. ही तुम्ही कडकही बनवू शकता आणि लाइटही. एका भांड्यात पाणी उकडून घ्या. त्यात टी बॅग टाका. चहा १० ते १२ मिनिटांपर्यंत पुन्हा उकडू द्या. त्यानंतर चहा थंड होऊ द्या. एका कपात बर्फ टाका आणि त्यावरून त्यात चहा ओता. त्यात थोडा लिबांचा रस टाका आणि चहा ३ ते ५ मिनिटे थंड होऊ द्या. तुमची आइस्ड टी तयार आहे.  

आइस्ड टी ने होणारे फायदे

१) जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो. कारण यात कॅलरी आणि शुगरचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे तुम्हाला याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. खासकरून त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे लोक गोड आणि शुगर असलेले पेय पिणे पसंत करतात. 

२) या चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. या चहातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि पोषक तत्व रोगप्रतिकारक शक्ती चांगल्याप्रकारे काम करण्यासाठी उत्तेजित करतात. त्यामुळे वेगवेगळ्या रोगांपासून शरीराच बचाव होतो. 

३) या चहाच्या सेवनामुळे तुमचा वेगवेगळ्या हृदयरोगांपासूनची बचाव होतो. आइस्ड टीमध्ये असलेलं फ्लेवोनॉइड एक फार चांगलं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे. ज्याने हृदयाच्या धमन्या आणि रक्तवाहिन्यातील सूज कमी होते. त्यामुळे याने हृदयासंबंधी होणाऱ्या रोगांपासून तुमचा बचाव होतो. 

४) या चहामुळे डायबिटीज कमी करण्यासही मदत मिळते. साखर न टाकता आइस्ड टी सेवन करत असाल तर ब्लॅक टीमध्ये आढळणारे तत्व तुमच्या रक्तातील शुगरचा स्तर नियंत्रित ठेवतात. सोबतच शरीरातील इन्सुलिन रेसिस्टेंट वाढण्यासही मदत मिळते.  

५) शरीर फ्री रेडिकल्सपासून मुक्त राहतं. ब्लॅक टीमध्ये अनेक महत्वपूर्ण तत्व आढळतात जसे की, फ्लेवोनॉइड, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम जे शरीरातून फ्री रॅडिकल्सला बाहेर काढतात. हे फ्री रॅडिकल्स तुमच्या शरीरात तणाव निर्माण करण्याचं कारण ठरतात. 

Web Title: Drink iced tea in summer it will decrease body weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.