Health Care Tips: लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी नियमित करा लस्सीचं सेवन, जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 04:58 PM2022-06-14T16:58:44+5:302022-06-14T16:59:44+5:30

Lassi Benefits For Liver: अनेकांना हे माहीत नसेल की, लस्सी लिव्हर  हेल्दी ठेवण्याचंही काम करते. चला जाणून घेऊ लस्सी आपल्या लिव्हरसाठी कशाप्रकारे फायदेशीर आहे.

Drink lassi daily to keep liver healthy, Benefits of drinking lassi | Health Care Tips: लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी नियमित करा लस्सीचं सेवन, जाणून घ्या फायदे

Health Care Tips: लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी नियमित करा लस्सीचं सेवन, जाणून घ्या फायदे

Next

Lassi Benefits For Liver: हे तर सर्वांनाच माहीत आहे की, डेअरी प्रॉडक्ट्स आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात. यात दूध, दही, पनीर आणि तूप यांचा समावेश आहे. दही तर वेगवेगळ्या प्रकारे खाल्लं जातं. काही लोक साधं दही खातात तर काही लोक छास आणि लस्सीच्या माध्यमातून सेवन करतात. पण अनेकांना हे माहीत नसेल की, लस्सी लिव्हर  हेल्दी ठेवण्याचंही काम करते. चला जाणून घेऊ लस्सी आपल्या लिव्हरसाठी कशाप्रकारे फायदेशीर आहे.

लस्सीतील पोषक तत्व

लस्समध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन  सी आणि फोलिक अॅसिड अधिक प्रमाणात आढळून येतं. त्यासोबतच लस्सीमध्ये कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फोरस, पोटेशिअम आणि झिंकही असतं. 

- लिव्हरसाठी लस्सी फार फायदेशीर असते. कारण यातील पोषक तत्व लिव्हरला हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. दह्यात असलेलं प्रोबायोटिक्स नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीजला रोखण्याचं काम करतं.

- लस्सी वजन कमी करण्यातही मदत करेत. ज्यामुळे लस्सी लिव्हरसोबतच पूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

- लस्सीमधील अॅंटीऑक्सीडेंट्स त्वचेसाठी बरेच फायदेशीर असतात. याने त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव केला जातो. 

- लस्सीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे याचं सेवन केल्याने तुम्हाला एनर्जीही भरपूर मिळते. 

- लस्सीमुळे वजन कमी करण्यासही मदत मिळते. यातील प्रोबायोटिक्स पोटावरील चरबी कमी करण्यात फायदेशीर असतं. ज्यामुळे लिव्हरही चांगलं राहतं.

- लस्सीचं नियमित सेवन केल्याने शरीर आणि पोट थंड राहतं. ज्यामुळे पोटासंबंधी समस्याही कमी होतात.

Web Title: Drink lassi daily to keep liver healthy, Benefits of drinking lassi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.