बसून बसून चरबी वाढतेय? प्या घरच्याघरी बनवले जाणारे 'हे'ज्यूस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 09:38 PM2021-05-23T21:38:17+5:302021-05-23T21:39:05+5:30

वजन कमी करण्यासाठी, पोटाचा घेर घालवण्यासाठी लोक नानाविविध उपाय करतात. व्यायाम करतात. मात्र परिणाम असतो झिरो आता याच झिरोला झिरो फिगर बनवा. पोटाचा घेर असा कमी करा.

Drink low calorie homemade juice to loose belly fat | बसून बसून चरबी वाढतेय? प्या घरच्याघरी बनवले जाणारे 'हे'ज्यूस

बसून बसून चरबी वाढतेय? प्या घरच्याघरी बनवले जाणारे 'हे'ज्यूस

Next

घरबसल्या अनेकांचे वजन तर वाढतेयच पण पोटाचा घेरही वाढतोय. अगदी घरात असूनही आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. तसेच अवेळी खाणे, अवेळी झोप, फास्ट फूड खाणे यामुळे अनेक शारीरीक समस्या, आजार निर्माण होतात. यापैकीच एक समस्या म्हणजे पोटाचा वाढता घेर. वजन कमी करण्यासाठी, पोटाचा घेर घालवण्यासाठी लोक नानाविविध उपाय करतात. व्यायाम करतात. मात्र परिणाम असतो झिरो आता याच झिरोला झिरो फिगर बनवा. पोटाचा घेर असा कमी करा.


हिरव्या भाज्यांचा ज्यूस
हिरव्या भाज्या जेवणात असणे फार महत्वाचे मानले जाते. मात्र, आता तुम्ही पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपण हिरव्या भाज्यांचाही वापर करु शकता. आपण आपल्या आवडत्या हिरव्या भाज्यांचा ज्यूस बनवून पिऊ शकता. हिरव्या भाज्यांमध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक विटामिन व मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. तर यामध्ये असलेल्या फायबरमुळे आपले पोट भरलेले राहते.


ओव्याचा ज्यूस
ओवा हा बहुगुणी तर आहेच पण ओवा आपल्या सहज उपलब्ध असतो.  आयुर्वेदात ओवा पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये असेलला थायमोक्विनोनमधील घटक अँटिऑक्सिडंट असतो. हा घटक शरीरावर नैसर्गिकरित्या विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतो. यामुळे ओटीपोटातील चरबी कमी होते.


बीटचा रस
शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी बीटाइतके प्रभावी फळ नाही. बीटामध्ये लोह असते, जे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते. बीटामध्ये असलेल्या प्रोटीन व फायबर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच यात कॅलरीचे प्रमाणही कमी असते.


डाळिंबाचा ज्यूस
डाळिंबात झिंक, पोटॅशियम, फायबर, आयर्न, ओमेगा-६आदि पोषक तत्वे असतात. त्यामुळे डाळिंब आपल्या शरीरासाठी लाभदायी असते. यामध्ये डाएटरी नाइट्रेट्स असतात, जे एक्सरसाईजच्या मदतीने वजन घटविण्यास मदत करतात.


आले आणि लिंबाचा रस
आले आणि लिंबू हे दोघेही इम्युनिटी वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म रेट देखील वाढतो. तसेच यामुळे शरीरातील अन्न चांगले पचते आणि अतिरिक्त चरबी तयार होत नाही. दररोज याचे सेवन केल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो.

Web Title: Drink low calorie homemade juice to loose belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.