झटपट पोटाचा घेर कमी करायचाय? काकडीचा आणि पुदिन्याचा ज्यूस प्याल तर व्यायामाशिवाय बारीक व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 11:15 AM2020-01-30T11:15:51+5:302020-01-30T11:16:29+5:30
सध्याच्या काळात वजन कमी करण्यसाठी महिला अनेक प्रयत्न करत असतात.
सध्याच्या काळात वजन कमी करण्यसाठी महिला अनेक प्रयत्न करत असतात. कारण अनेक महिलांना आणि पुरूषांना सात ते आठ तास बसून काम करावं लागत असल्यामुळे पोटाची आणि कमरेची चरबी वाढण्याची समस्या ही कॉमन दिसून येते. त्यामुळे शरीर आकर्षक दिसत नाही. पण वजन वाढण्याची समस्या अधिकच वाढत जाते. तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करून थकला असाल तर आज आम्ही तुम्हाला पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही खास गोष्टी सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही पोटावरची चरबी कमी करू शकता.
आपण बारिक होण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करत असतो. तसंच आहारातून काही पदार्थांचे सेवन करणं टाळत सुद्धा असतो. जसं की काहीजण मैदायुक्त पदार्थ अथवा बटाटा, तेलकट पदार्थांचं सेवन आहारातून वगळत असतात. पण तुम्हाला हे माहित आहे का काकडी आणि पुदिन्याचा वापर करून तुम्ही पोटावरची वाढलेली चरबी कमी करू शकता. लिंबू, पुदिना आणि आल्याचा आहाराच वापर करून शरीरावरची चरबी कमी करता येऊ शकते. फॅट बर्निंगची प्रकिया ही वेगाने होत असते. या ड्रिंकमुळे ओवर इटींगसारख्या समस्येचा सामना करावा लागतो. फॅट बर्न करण्यासाठी असं तयार करा हेल्दी ड्रिंक. ( हे पण वाचा-तुमच्या 'या' चुकांमुळे रक्तवाहिन्या होतात खराब; डायबिटीस, बीपीसह हार्ट अटॅकचा वाढतोय धोका)
अर्धा लिटर पाणी.
एक काकडी.
एक चमचा आलं.
पुदिन्याची पानं.
काळं मीठ.
कृती
काकडी मिक्सर मधून वाटून त्याचं मिश्रण पाण्यात घाला. त्यानंतर किसलेलं आलं आणि वाटलेली पुदिन्याची पानं घाला. नंतर या ड्रिंकमध्ये चवीनुसार काळं मीठ घाला. नंतर लिंबाचा रस पिळून घाला. अशा प्रकारे तुमचं हेल्दी डाएट ड्रिंक तयार होईल. दिवसातून ३ ते ४ वेळा या ड्रिंकचे सेवन करा. चांगलं मिक्स होण्यासाठी रात्रभर भिजवून ठेवतात.
या ड्रिंकचं सेवन केल्याने तुमच्या शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल. तसंच पोटाचा आकार कमी झाल्याचा बदल दिसून येईल. ( हे पण वाचा-धुळीच्या संपर्कात येताच जोरजोरात शिंका येऊ लागतात? वाचा काय आहे अॅलर्जीचं नेमकं कारण...)
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असते .त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच शरीरासाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)