भूतलावरचं अमृत प्या आणि चीरतरुण राहा..

By admin | Published: June 9, 2017 06:52 PM2017-06-09T18:52:50+5:302017-06-09T18:52:50+5:30

दररोज नारळपाणी पिण्याचे ११ फायदे

Drink the nectar on the ground and stay tidy. | भूतलावरचं अमृत प्या आणि चीरतरुण राहा..

भूतलावरचं अमृत प्या आणि चीरतरुण राहा..

Next

- मयूर पठाडे

नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष म्हणतो. या नारळाच्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला उपयोग होतो. नारळपाण्याबाबत तर काय सांगावं?
भूतलावरचं जणू अमृतच.
या अमृतपाण्याच्या नियमित सेवनानं खरोखर तुम्हाला चीरतारुण्य लाभू शकतं. सकाळी उठल्या उठल्या जर एक ग्लासभर नारळपाणी तुम्ही प्यालात तर तुमच्या आरोग्याच्या समस्या कुठल्याकुठे पळून जातील.
काय आहेत नारळपाण्याचे फायदे?
१- नारळपाण्याने दिवसभर तुम्हाला प्रसन्न वाटेल.
२- उन्हाळच्या दिवसात तर नारळपाणी खूपच उत्तम. त्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता ते भरून काढेल.
३- नारळपाण्यात भरपूर प्रमाणात अ‍ॅँटी आॅक्सिडंट्स, अमिनो अ‍ॅसिड्स, एंजाइम्स, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, सी व्हिटॅमिन याशिवाय अनेक उपयुक्त घटक असतात. ते आयोग्यासाठी फारच फायदेशीर आहेत.
४- डायरिया, उलटी यासारख्या विकारांवर अत्यंत गुणकारी.
५- नारळपाण्यात कोलेस्टेरॉल बिलकुल नाही.

 


६- ते फॅट फ्री आहे.
७- नारळपाणी हृदयविकारांपासून आपल्याला मुक्त ठेवतं.
८- हायपरटेंशन आणि हाय बीपी ताब्यात ठेवण्यासाठी नारळपाणी अतिशय उपयुक्त आहे.
९- मायग्रेनची समस्या नारळपाण्यामुळे दूर होते.
१०- नारळपाण्यात भरपूर फायबर्स असल्यामुळे शरीरातील शुगर कंट्रोल राहते.
११- शरीरातील इन्फेक्शन नारळपाण्यामुळे दूर होतं.

Web Title: Drink the nectar on the ground and stay tidy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.