रक्त शुद्ध करून विषारी पदार्थ बाहेर काढणारा खास चहा, अनेक गंभीर समस्या होतील दूर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 01:03 PM2024-08-14T13:03:46+5:302024-08-14T13:04:13+5:30

Herbal Tea For Body Detox: रक्त शुद्ध करण्याचं काम म्हणजे बॉडी डिटॉक्स करण्याच्या कामात आपल्या रोजच्या वापरातील अनेक गोष्टी मदत करतात. 

Drink these herbal tea to detox body purify blood naturally | रक्त शुद्ध करून विषारी पदार्थ बाहेर काढणारा खास चहा, अनेक गंभीर समस्या होतील दूर...

रक्त शुद्ध करून विषारी पदार्थ बाहेर काढणारा खास चहा, अनेक गंभीर समस्या होतील दूर...

Herbal Tea For Body Detox: शरीरात वेगवेगळ्या कारणांनी विषारी पदार्थ जमा होत असतात. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वेळोवेळी शरीरातील हे विषारी पदार्थ बाहेर काढून रक्त शुद्ध करण्याची गरज असते. रक्त शुद्ध करण्याचं काम म्हणजे बॉडी डिटॉक्स करण्याच्या कामात आपल्या रोजच्या वापरातील अनेक गोष्टी मदत करतात. 

बॉडी डिटॉक्स करण्याचे अनेक उपाय आहेत. पण तुम्ही फार सहजपणे आणि फार जास्त मेहनत घेताही रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकता. यासाठी तुम्हाला डाएटमध्ये काही आयुर्वेदिक चहांचा समावेश करावा लागेल. ज्याने बॉडी आणि रक्त दोन्हीही डिटॉक्ट होईल. अशात आम्ही तुम्हाला रक्त स्वच्छ करणाऱ्या काही चहांबाबत सांगणार आहोत.

धणे आणि पदीन्याचा चहा

वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे धणे आणि पदीना रक्त शुद्ध करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पदीन्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. रक्त शुद्ध करण्यासाठी तुम्ही हिरवे कोथिंबिर किंवा हिरव्या धण्यांचा चहा पदीन्यासोबत बनवू शकता. एका ग्लास पाण्यात कोथिंबिरीची काही पाने आणि पदीन्याची पाने टाका. हे दहा मिनिटे उकडू द्या. त्यानंतर हे गाळून याचं सेवन करा. रोज सकाळी हा चहा प्यायल्याने तुम्हाला खूप फायदे मिळतील.

तुळशीचा चहा

तुळशी रक्त साफ करण्याचं काम सहजपणे करू शकता. रोज तुळशीची १० ते १२ पाने तुमचं रक्त शुद्ध करण्यास तुमची मदत करू शकतात. तुळशीचा चहा करण्यासाठी 1 ग्लास पाणी घ्या. त्यात तुळशीची पाने टाका. पाणी जेव्हा अर्ध शिल्लक राहील तेव्हा ते गाळून चहासारखं एक एक घोट प्यावं. हा चहा तुम्ही सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळ घेऊ शकता.

लिंबाचा चहा

लिंबूही शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. यातील व्हिटॅमिन सी आणि मिनरल्स शरीरातील रक्त शुद्ध करण्यासोबतच पचन तंत्रही मजबूत करण्याचं काम करतात. लिंबाचा चहा तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात थोडी चहा पावडर टाका आणि ते उकडून घ्या. त्यानंतर पाणी गाळून त्यात अर्ध लिंबू पिळा. याचं तुम्ही रिकाम्या पोटी सेवन करू शकता.

दालचीनी आणि गुळाचा चहा

दालचीनी शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. हा स्पेशल चहा तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात दालचीनीचा छोटा तुकडा टाका आणि एक तुकडा गूळ टाका. पाणी जेव्हा अर्ध राहील तेव्हा ते गाळून पिऊ शकता.

(टिप : वरील लेखातील टिप्स या सामान्य माहितीवर आधारित आहे. तुम्हाला काही समस्या असेल किंवा आजार असेल तर या हर्बल चहाचं सेवन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा. कारण काही लोकांना याचे साइड इफेक्टही होऊ शकतात.)

Web Title: Drink these herbal tea to detox body purify blood naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.