​कोमट पाणी प्या अन् फिट राहा !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2016 04:48 PM2016-12-14T16:48:42+5:302016-12-14T16:48:42+5:30

पाणी म्हणजे जीवन, हे आपल्याला माहितच आहे. प्रत्येक मनुष्याच्या आरोग्याचे रहस्य पाण्यात लपलेले आहे. मात्र बºयाचदा उन्हाळ्यात आणि इतर वेळेतही अती थंड पाणी पिले जाते.

Drink warm water and stay fit! | ​कोमट पाणी प्या अन् फिट राहा !

​कोमट पाणी प्या अन् फिट राहा !

googlenewsNext
णी म्हणजे जीवन, हे आपल्याला माहितच आहे. प्रत्येक मनुष्याच्या आरोग्याचे रहस्य पाण्यात लपलेले आहे. मात्र बºयाचदा उन्हाळ्यात आणि इतर वेळेतही अती थंड पाणी पिले जाते. मात्र कोमट पाण्याचे फायदे साध्या पाण्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत. कोमट पाणी हे शरीरात एका औषधासारखे काम करते.

कोमट पाण्याचे फायदे 
* आरोग्यासोबत सौदर्यात भर टाकण्यासाठी कोमट पाणी खूप महत्वाचे आहे. कोमट पाणी पिल्याने कफ दूर होण्यास मदत होते. शिवाय नियमित कोमट पाणी पिल्यास लठ्ठपणापासून मुक्तता मिळते. 

* गरम पाण्याने आंघोळ केल्याने थकवा दूर होतो. त्यासोबतच त्वचेला तजेलदार बनवतो आणि त्वचेविषयीच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो.

* गरम पाणी सौंदर्य आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींसाठी गुणकारी औषध आहे. जर त्यात गुलाब पाणी टाकून शरीरावर लावले तर त्याने तुम्हाला आराम मिळतो. शरीरात होणाºया वेदनेपासूनही सुटका मिळते.

* जर खूप कष्ट करुन थकत असाल तर दिवसभराचा थकवा घालवण्याठी आणि आराम मिळविण्यासाठी गरम पाणी खूप महत्वाचे आहे. 

* जर तुम्ही नियमित कोमट पाणी प्यायला तर तुम्ही आधिक ताजेतवाने राहता.

* नियमित कोमट पाणी पिल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय रक्तभिसरण संतुलित करणे आणि रक्त प्रवाहदेखील चांगला राहतो. 

* गरम पाणी मध आणि लिंबाच्या रसासोबत घेतले तर तुमची प्रतिकार शक्ती वाढते. या मिश्रणामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

* मूत्रपिंडसाठी थंड पाणी हे हानिकारक मानले जाते तर दुसरीकडे गरम पाण्यामुळे मूत्रपिंडाचे स्वास्थ चांगले राहते. सकाळ-संध्याकाळ गरम पाणी नियमित पिल्याने शरीरातील घाणीचा निचरा होण्यास मदत होते.

* कोमट पाणी हाडे आणि सांध्यासाठी खूप महत्वाचे आहे. गरम पाणी सांध्यातले घर्षण कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे भविष्यात सांधेदुखीसारखे आजार कमी होण्यासाठी मदत होते. तरी एक गैरसमज असा पण आहे की, गरम पाणी सर्व शरीराला तेवढी मदत करत नाही, जेवढे थंड पाणी मदत करते.

* श्वास आणि मूत्रपिंडाचा आजार असलेल्या व्यक्तींनी थंड पाणी आजिबात पिेऊ नये. ते फुफ्फसांनासुद्धा हानिकारक आहे.

Web Title: Drink warm water and stay fit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.