लठ्ठपणा, चरबी दूर करण्यासाठी रिकाम्या पोटी प्या हे खास पाणी, शरीराला मिळतील इतरही अनेक फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:36 AM2024-05-28T10:36:16+5:302024-05-28T10:37:20+5:30
Ajwain water benefits : आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी असाच एक सोपा उपाय सांगणार आहोत. इतकंच नाही तर हा उपाय केल्याने कोलेस्ट्रॉल-डायबिटीस आणि हृदयरोगांचा धोकाही कमी होतो.
Ajwain water benefits : आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. वजन वाढलं तर शरीरात अनेक गंभीर आजारही घर करतात. अशात लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, वजन कमी करण्यासाठी आपल्या घरातील किचनमध्येच अनेक उपाय असतात. ज्यांचा वापर करून तुम्ही वजन कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी असाच एक सोपा उपाय सांगणार आहोत. इतकंच नाही तर हा उपाय केल्याने कोलेस्ट्रॉल-डायबिटीस आणि हृदयरोगांचा धोकाही कमी होतो.
वजन कमी करतं ओव्याचं पाणी
ओवा जवळपास सगळ्याच घरांमध्ये असतो. ओव्याने वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढते. सोबत बरेच लोक मुखवास म्हणूनही ओव्याचं सेवन करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, ओव्याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते.
बेली फॅट म्हणजे पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी लोक नको नको ते उपाय करतात. पण पोटावरील चरबी काही कमी होत नाही. अशात ओव्यापासून तुम्ही एक असं खास ड्रिंक तयार करू शकता ज्याने तुमची चरबी गळून जाईल आणि पोट आत जाईल. हे खास ड्रिंक म्हणजे ओव्याचं पाणी.
पोट राहतं चांगलं
ओव्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. यातील काही पोषक तत्वे पोटासाठी फार फायदेशीर असतात. याने पोट हेल्दी राहतं आणि मेटाबॉलिज्म फास्ट होतं. मेटाबॉलिज्म फास्ट झालं तर वजनही लवकर कमी होतं. यासोबत गॅस, अपचन, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता अशा समस्याही दूर होतात.
तुम्ही नियमितपणे ओव्याचं पाणी प्याल तर तुम्हाला भरपूर फायदे मिळतील. ओव्यामध्ये फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. जर तुम्ही सकाळी ओव्याचं पाणी प्याल तर बराच वेळ पोट भरलेलं राहतं आणि पुन्हा पुन्हा काही खाण्याची ईच्छा होत नाही.
ओव्यामध्ये फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अनेक अॅक्टिव तत्व असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. सोबतच पोटावरील चरबीही कमी करतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ओव्याच्या पाण्याचं नियमित सेवन केलं पाहिजे.
कसं तयार कराल ओव्याचं पाणी?
ओव्याचं पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या. यात एक चमचा ओव्याच्या बीया टाका. आता हे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी प्या.