उपाशी पोटी चहा पिण्याची सवय आहे का? जाणून घ्या या सवयीने साइड इफेक्ट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 02:42 PM2022-06-16T14:42:45+5:302022-06-16T14:43:01+5:30
Morning Tea in Empty Stomach: सकाळपासून रात्री उशीरापर्यंत लोक चहाचं सेवन करतात. चहा एकप्रकारे स्ट्रेस दूर करण्याचं माध्यम आहे. एक कप चहाने ताजंतवाणं वाटतं आणि सगळा थकवा दूर होतो.
Morning Tea in Empty Stomach: भारतात चहा शौकीनांची काही कमी नाही. हेच कारण आहे की, चहा पाण्यापेक्षा जास्त प्यायलं जाणारं पेय आहे. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत लोक चहाचं सेवन करतात. चहा एकप्रकारे स्ट्रेस दूर करण्याचं माध्यम आहे. एक कप चहाने ताजंतवाणं वाटतं आणि सगळा थकवा दूर होतो.
काही लोकांना सकाळी उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते ज्याला 'बेड टी' असंही म्हटलं जातं. याशिवाय ते दिवसातील काम योग्यप्रकारे करू शकत नाहीत. तसेच ज्या लोकांची ऑफिसमध्ये लवकर शिफ्ट असते, ते तर चहाशिवाय राहूच शकत नाहीत. कारण ते झोप उडवण्यासाठी चहा पित असतात.
आरोग्याला नुकसानकारक आहे 'बेड टी'
सकाळी उठून चहा पिण्याची सवय भलेही डोक्याला शांतता देणारी असेल, पण आरोग्यासाठी हे नुकसानकारक आहे. कारण रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने याचे अनेक साइड इफेक्ट्स होऊ शकतात. चला जाणून घेऊ रिकाम्या पोटी चहा पिण्याचे साइड इफेक्ट्स...
'बेड टी' पिण्याचे साइड इफेक्ट्स
- बेड टी घेतल्याने सर्वात मोठी समस्या अॅसिडीटी आणि पोटदुखी होऊ शकते. हे पचनक्रियेसाठी अजिबात चांगलं नाही.
- सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने बाइल ज्यूसची प्रक्रिया योग्यप्रकारे होत नाही, ज्यामुळे अस्वस्थता जाणवते.
- जर सकाळी उठून चहा प्याल तर याने तुम्हाला थोडा वेळ फ्रेश वाटेल, पण याने स्लीप डिसॉर्डर होऊ शकते.
- सकाळी उठून चहा प्यायल्याने वजन वेगाने वाढू शकतं. कारण यात शुगर कंटेंट असतं.
- उपाशी पोटी चहा प्यायल्याने अल्सरची समस्याही होऊ शकते. सोबतच प्रोटीनच्या कमतरतेचा धोकाही होतो.
- बेड टी घेतल्याने न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम होऊ शकतात. ज्याने भूक कमी होण्याची भीती असते.
- चहामध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं, जे ब्लड प्रेशर वाढण्यास जबाबदार आहे.