झोपण्यापूर्वी कॉफी घेताय? थांबा, असं करणं घातक ठरू शकतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 11:37 AM2018-09-04T11:37:10+5:302018-09-04T11:37:57+5:30

काही लोकांना बिछान्यावर पडल्या पडल्या झोप येते. पण काही लोकांना झोप येतच नाही. परिणामी याचा परिणाम त्यांच्या रोजच्या जीवनावर होतो.

drinking caffeine just before sleeping is bad for health | झोपण्यापूर्वी कॉफी घेताय? थांबा, असं करणं घातक ठरू शकतं!

झोपण्यापूर्वी कॉफी घेताय? थांबा, असं करणं घातक ठरू शकतं!

काही लोकांना बिछान्यावर पडल्या पडल्या झोप येते. पण काही लोकांना झोप येतच नाही. परिणामी याचा परिणाम त्यांच्या रोजच्या जीवनावर होतो. दररोज 7 ते 9 तासांची झोप घेणं गरजेचं असतं, असं अनेक रिसर्चमधून सिद्ध झाल्याचं आपण पाहतो. पण अनेक लोक असे आहेत जे फार कमी झोपतात. 
काही लोकांना झोप येतच नाही. पण यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही. असे काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाल लवकर झोप येण्यास मदत होईल. जाणून घेऊयात अशा उपायांबाबत....

जर तुम्ही 22 च्या पुढच्या वयोगटातील असाल तर दररोज साडे सात ते आठ तासांची झोप घेणं आवश्यक आहे. लहान मुलं आणि तरूण मुलांनी साडे आठ तास ते अकरा तासांची झोप घेणं गरजेचं असतं. 

रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही कॅफेन असणाऱ्या पदार्थांचे म्हणजेच चहा-कॉफी सेवन करणं टाळावं. जर रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करत असाल तर कॅफेन असणारी उत्पादनं आणि निकोटीन यांपासून दूर रहा. जर तुम्ही कॅफेनयुक्त गोष्टींचं सेवन केलंत, तर त्यांचा प्रभाव शरीरावर तसाच राहतो आणि तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करत असाल तरीदेखील तुम्हाला झोप लागत नाही. तसेच हे पदार्थ शरीरासाठीही हानिकारक ठरतात.

रात्रीचं जेवण झोपण्यापूर्वी 2 ते 3 तासांपूर्वीच घेणं गरजेचं असतं. जर तुम्ही झोपण्यापूर्वी जास्त जेवण जेवताय तर तुम्हाला झोपण्यास त्रास होईल. त्यामुळे झोपण्याच्या काही वेळ आधी जेवण करणं गरजेचं असतं. 

रात्री झोपण्याआधी काही अशा गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला झोप येण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, काही पुस्तकं वाचा, गाणी ऐका.

जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि झोप येत असेल तर लगेचच हातातील कामं बाजूला ठेवून झोपा. जबरदस्ती जागं राहू नका. 

चेरी, दूध, केळी, बदाम, सलाड, हर्बल चहा इत्यादी गोष्टींचे सेवन करणं गरजेचं असतं. यामुळे चांगली झोप घेण्यास मदत होईल. 

रात्री लवकर झोपण्याचे फायदे -

- तणाव कमी होतो. 

- सकाळी ताजंतवानं वाटतं. 

- स्मरणशक्ती सुधारते.

- वजन कमी करण्यास मदत मिळते.

- अनेक आजारांपासून शरीराचा बचाव होतो.

Web Title: drinking caffeine just before sleeping is bad for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.