रोज नारळ पाणी प्यायल्याने लगेच दूर होतील या 5 समस्या, सोबतच मिळवा अनेक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:48 AM2023-12-13T10:48:31+5:302023-12-13T10:48:54+5:30

Coconut Water Benefits : नारळ पाणी केवळ उन्हाळ्यातच नाहीतर सगळ्याच ऋतुंमध्ये प्यायला हवं. कारण नारळ पाणी केवळ हायड्रेटिंगसाठीच नाहीतर शरीराला पोषण देण्यासाठीही चांगलं असतं. 

Drinking coconut water every day cures these 5 diseases | रोज नारळ पाणी प्यायल्याने लगेच दूर होतील या 5 समस्या, सोबतच मिळवा अनेक फायदे

रोज नारळ पाणी प्यायल्याने लगेच दूर होतील या 5 समस्या, सोबतच मिळवा अनेक फायदे

Coconut Water Benefits : नारळ पाण्यात अनेक पोषक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी फार चांगले मानले जातात. हे एक उत्तम नॅच्युरल हायड्रेटिंग ड्रिंक आहे. जे जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यात पितात. पण हे पाणी केवळ उन्हाळ्यातच नाहीतर सगळ्याच ऋतुंमध्ये प्यायला हवं. कारण नारळ पाणी केवळ हायड्रेटिंगसाठीच नाहीतर शरीराला पोषण देण्यासाठीही चांगलं असतं. 

जर तुम्हाला एक हेल्दी आणि फ्रेश ड्रिंक प्यायचं असेल तर नारळ पाणी चांगला पर्याय आहे. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित 2015 च्या एका रिसर्चमध्ये आढळलं की, नारळ पाण्याने ब्लड शुगर लेव्हलही कमी केली जाऊ शकते. यासाठी उंदरांवर अभ्यास करण्यात आला ज्यांना डायबिटीस होता. हे पाणी मनुष्यांसाठीही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ नारळ पाणी नियमित पिण्याची 5 कारणे....

1) त्वचेसाठी फायदेशीर

नारळ पाणी तरल पदार्थांचं एका चांगला सोर्स आहे आणि याने शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत मिळते. तसेच या अॅंटी-ऑक्सिडेंट असल्याने याने तुमच्या फाइन लाईन्स आणि सुरकुत्या दूर करण्यासही मदत मिळते. अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होत नाही. यात व्हिटॅमिन सी आणि ई सुद्धा असतात ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

2) किडनी स्टोनपासून बचाव 

किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण सोबतच थोडं नारळ पाणीही प्यायला हवं. कारण याने लघवीची फ्रीक्वेंसी वाढते आणि स्टोन तयार करणारे खनिज कमी तयार होतात. अशात किडनी स्टोनपासून तुमचा बचाव होतो.

3) पचन चांगलं होतं

नारळ पाण्यात भरपूर फायबर असतं. जे पचन चांगलं करण्यास मदत करतं. यात असेही काही एंजाइम असतात जे तुमच्याकडून खाण्यात आलेल्या अन्नाला तोडण्यास मदत करतात. तसेच याने पोटाच्या अनेक समस्याही दूर होतात.

4) इलेक्ट्रोलाइट संतुलन

नारळ पाण्यात पोटॅशिअम, सोडिअम आणि मॅग्नेशिअम असतात, जे महत्वाचे इलेक्ट्रोलाइट्स आहेत. यांनी शरीरातील द्रव्याला संतुलित ठेवण्यात मदत मिळते. हे त्या लोकांसाठी फायदेशीर असतात ज्यांना खूप जास्त घाम येतो.

5) ब्लड प्रेशर संतुलन

नारळ पाण्यात ब्लड प्रेशर कमी करण्यास किंवा संतुलित ठेवण्यास मदत मिळते. खासकरून हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरतं. आपल्या हाय पोटॅशिअम तत्वांमुळे याने सोडिअमचा प्रभाव संतुलित करण्यास मदत मिळते.
 

Web Title: Drinking coconut water every day cures these 5 diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.