पावसाळ्यात नारळ पाणी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 10:14 AM2024-07-10T10:14:49+5:302024-07-10T10:16:07+5:30
Coconut Water In Monsoon: अनेकांना असं वाटतं की, या दिवसात नारळाचं पाणी प्यायल्याने पोट खराब होऊ शकतं. पण यात किती तथ्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत.
Coconut Water In Monsoon: उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक नारळाचं पाणी पितात. कारण त्याने शरीराला थंड वाटतं आणि पाण्याची कमतरता भरून निघते. त्यासोबतच त्यातील पोषक तत्वही शरीराला मिळतात. उन्हाळा संपला की, अनेकांना प्रश्न पडतो की पावसाळ्यात नारळाचं पाणी प्यायचं की नाही? अनेकांना असं वाटतं की, या दिवसात नारळाचं पाणी प्यायल्याने पोट खराब होऊ शकतं. पण यात किती तथ्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत.
एक्सपर्ट सांगतात की, पावसाच्या दिवसातही नारळाचं पाणी पिऊ शकता. यात भरपूर मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. जे शरीराला खूप फायदे देतात. पावसाळ्यात तुम्ही कमी प्रमाणात पिऊ शकता.
पावसाळ्यात इम्यूनिटी आणि डायजेशन कमजोर होत असतं. ज्यामुळे वेगवेगळे आजार आणि पोटासंबंधी समस्या होत असतात. अशात नारळ पाण्याने पचनासंबंधी समस्या दूर होतात. पावसाळ्यात बॅक्टेरिया पोटात जातात. ज्यामुळे पोट खराब होतं. त्यामुळे नारळाचं पाणी तुमची मदत करू शकतं. ताजं नारळाचं पाणी पिऊन तुम्ही पोट चांगलं ठेवू शकता.
पावसाळ्यात नारळाचं पाणी जास्त प्याल तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. कारण नारळाच्या पाण्यात भरपूर सोडिअम असतं आणि त्यामुळे पावसाळ्यात जर तुम्ही नारळ पाण्याचं जास्त सेवन कराल तर तुम्हाला ब्लोटिंग आणि हायपरटेंशनची समस्या होऊ शकते. अशात नारळ पाणी कमी प्रमाणात प्यावं. काही लोकांना नारळ पाण्याची एलर्जी असते. जर त्यांनी पावसाळ्यात नारळ प्यायलं तर त्यांना सूज, पित्त, खाज अशा समस्याही होऊ शकतात.