फ्रीजमधील थंड पाणी प्यायल्याने वाढतो लठ्ठपणा, तुम्हालाही असेल सवय तर लगेच बदला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 12:59 PM2024-04-04T12:59:22+5:302024-04-04T13:00:07+5:30
Fridge Water Side Effects: अनेकांना हे माहीत नसतं की, फ्रिजमधील पाणी प्यायल्याने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
Fridge Water Side Effects: उन्हाळ्यात वाढत्या उकाड्यामुळे लोक हैराण झालेले असतात. आता तर उन्हाचा पारा आणखी वाढला आहे. अशात घराबाहेर निघणंही अवघड झालं आणि घामामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशात लोक शरीर थंड ठेवण्यासाठी बिनधास्तपणे फ्रिजमधील पाणी काढून गटागट पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, फ्रिजमधील पाणी प्यायल्याने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
फ्रिजमधील पाणी ठरू शकतं घातक
आता कुठे उष्णतेची लाट वाढली आहे. पुढे मे महिन्यात तर आणखीही तापमान वाढेल. अशात लोकांना तहानही खूप लागते आणि थंड पाणी पिण्याची गरज भासते. लोक कशाचाही विचार न करता फ्रिजमधील पितात. फ्रिजमधून डायरेक्ट थंड पाणी काढून प्यायल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकतं. तुम्हालाही अशी सवय असेल तर ही सवय लगेच बदला. कारण फ्रिजमधील थंट पाणी थेट प्यायल्याने लठ्ठपणासोबत इतरही गंभीर समस्या होतात.
हार्टसाठी घातक
फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने हार्टचं खूप जास्त नुकसान होतं. यामुळे ब्लड वेसल्स म्हणजे रक्तनलिका आकुंचन पावतात सोबतच ब्लड फ्लो सुद्धा हळुवार होतो. थंड पाण्यामुळे रक्तनलिका कठोर होतात आणि ज्यामुळे समस्या वाढू शकते.
लठ्ठपणा वाढतो
थंड पाणी प्यायल्याने शरीरातील फॅट हळूहळू वितळतं. लठ्ठपणा कमी करण्यास आणि फॅट बर्न करण्यास यामुळे समस्या होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर थंड पाणी अजिबात पिऊ नका. साधं पाणी प्यावं
पचन बरोबर होत नाही
थंड पाणी प्यायल्याने पचन तंत्र खराब होतं. ज्यामुळे पोटाच्या वेगवेगळ्या समस्या होतात. अशात फ्रिजचं थंड पाणी पिणं टाळलं पाहिजे.
एनर्जी लेव्हल राहते डाउन
थंड पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म सिस्टीम स्लो होतं. ज्यामुळे शरीर फॅट योग्यपणे रिलीज करू शकत नाही. अनेक हे कमजोरी आणि थकव्याचं कारण ठरू शकतं.
कफ होण्याची समस्या
जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्याने शरीरात कफ तयार होतो. जेव्हा शरीरात जास्त कफ तयार होतो तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आणि याच कारणाने सर्दी-खोकला वाढतो. त्यामुळे जेवण केल्यावर थंड पाणी सेवन करु नये. थोडं साधं पाणी प्यायल्यास समस्या होणार नाही.