जास्त चहाने हाडांना होते ही गंभीर समस्या, जाणून घ्या उपाय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:18 PM2018-12-28T12:18:32+5:302018-12-28T12:21:09+5:30
चहा पिण्याची सवय अनेकदा फार जास्त वाढते आणि त्याचे नुकसान वेळोवेळी बघायला मिळतात. याने वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो.
(Image Credit : HuffPost UK)
चहा पिण्याची सवय अनेकदा फार जास्त वाढते आणि त्याचे नुकसान वेळोवेळी बघायला मिळतात. याने वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आणि रोज एकपेक्षा जास्त वेळ चहा प्यायल्याने स्केलेटल फ्लोरोसिससारखा आजार होऊ शकतो. या आजारात आपली हाडे आतल्या आत कमजोर होता.
स्केलेटल फ्लोरोसिसमुळे शरीरात आर्थरायटिससारख्या वेदना होऊ लागतात. हा आजार खासकरुन हाडांमध्ये वेदना निर्माण करतो. त्यासोबतच कंबर, हात-पाय आणि सांधेदुखीची समस्याही वाढते.चहामध्ये असलेल्या फ्लोराइड मिनरल हाडांसाठी मोठा धोका आहे. तसेय यामुळे अल्सर आणि हायपर अॅसिडीटीसारख्या समस्याही होतात.
उशीरा दिसतो प्रभाव
चहाने हाडांचं नुकसान अचानक किंवा एकाएकी नाही तर फार उशीरा झालेलं बघायला मिळतं. चहाचा प्रभाव चहाची क्वालिटी, पिणाऱ्याचं शरीर आणि जेनेटिक्सच्या स्थितीवर निर्भर करतं. त्यासोबत चहा घेण्याची वेळ आणि चहा तयार करण्याची पद्धत यावरही निर्भर असतं. दुध आणि साखर असलेला चहा सतत पित राहणे चांगले नाही. खासकरुन तेव्हा जेव्हा तुम्ही हा चहा भूक घालवण्यासाठी, रिकाम्या पोटी किंवा जेवण केल्यावर लगेच घेता.
या गोष्टींची घ्या काळजी
चहा दिवसातून तीनपेक्षा जास्त वेळ घेऊ नये. खासकरुन रिकाम्या पोटी तर अजिबात घेऊ नये. प्रयत्न करा की, सामान्य चहाऐवजी ग्रीन टी, हर्बल टी सेवन करा. जेवणाआधी किंवा जेवणानंतर लगेच चहा घेऊ नका.
चहा प्यायल्यानंतर गुरळा करा आणि अर्ध्या तासाने भरपूर पाणी प्यावे. त्यासोबतच चहाची आठवण झाल्यावर छाछ, नारळाचं पाणी किंवा ज्यूस प्यायल्याने चहाची सवय सुटू शकते.