वजन कमी करायचंय? जेवणाआधी लावा 'ही' एक छोटीशी सवय!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 10:22 AM2018-12-13T10:22:17+5:302018-12-13T10:26:43+5:30

वाढलेलं वजन ही अलिकडे अनेकांसाठी मोठी समस्या झाली आहे. मग काय एकापेक्षा एक वेगवेगळे उपाय हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी केले जातात.

Drinking a glass of water before meal may help reduce weight | वजन कमी करायचंय? जेवणाआधी लावा 'ही' एक छोटीशी सवय!

वजन कमी करायचंय? जेवणाआधी लावा 'ही' एक छोटीशी सवय!

Next

(Image Credit : www.healthline.com)

वाढलेलं वजन ही अलिकडे अनेकांसाठी मोठी समस्या झाली आहे. मग काय एकापेक्षा एक वेगवेगळे उपाय हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी केले जातात. इतकच नाही तर यासाठी भरमसाठ पैसाही खर्च केला जातो. पण वजन अनेकांना हे माहीत नसतं की, वजन कमी करण्यासाठी पैशांची नाही तर योग्य ट्रिकची गरज आहे. अशीच एक ट्रिक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. म्हणजे जेवणाआधीची तुमची एक छोटीशी सवय तुम्हाला केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरते. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे याने आपल्या शरीराला कोणतंही नुकसान होणार नाही. 

वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. पण त्याचा फायदा होतोच असे नाही. अनेकदा खूप पैसा खर्च करुनही हवा तो परिणाम बघायला मिळत नाही. पण पैसे खर्च न करताही वजन कमी करता येऊ शकतं, हे अनेक रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. त्यासाठी केवळ तुम्हाला योग्य पद्धतींचा वापर करावा लागणार आहे. 

काय करावे?

अमेरिकेतील प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट इलाना मुरस्टाइननुसार, जेवणाआधी साधारण एक ग्लास पाणी प्यायल्याने तुम्ही फिट राहू शकता. इलानानुसार काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जेवणाआधी पाणी प्यायल्याने प्रमाणापेक्षा जास्त पदार्थ खाल्ले जात नाहीत. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

(Image Credit : gulp.ie)

खरंतर अनेकजण तहान लागण्याकडे भूकेच्या दृष्टीकोनातून बघतात. अशावेळी जेवण करताना पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतं, जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं. त्यामुळे जेवणाआधी एक ग्लास पाणी पिणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं. 

आयुर्वेदातही याचा उल्लेख

भारतीय आयुर्वेदात जेवणाआधी आणि जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे शरीरासाठी चांगलं नसल्याचं सांगितलं गेलं आहे. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, असे केल्याने व्यक्तीची पचनक्रिया कमजोर होऊ शकते. पण याजागी जेवण करताना मधे पाणी पिणे योग्य सांगण्यात आलं आहे. 

आयुर्वेदानुसार, जेवण करताना मधून मधून एक-एक घोट पाणी प्यायला हवं. याने पदार्थ आणकी मुलायम होतो आणि ते पोटात पचन्यासाठीही सोपं जातं. सोबतच या पद्धतीने व्यक्ती जास्त जेवण करण्यापासूनही बचावतो. इतकेच नाही तर जास्त तेलकट किंवा मसालेदार भाज्या खाल्ल्या असतील तर यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांनाही रोखता येऊ शकतं. 

कसं असावं पाणी?

फार जास्त थंड किंवा फार जास्त गरम पाणी पिणे टाळावे, शरीरासाठी सामान्य तापमान असलेलं पाणी पिणे अधिक फायद्याचं असतं. याने तेल कमी केलं जातं आणि पदार्थ पचन्यासही मदत होते. इतकेच नाही तर याने फॅट बर्न होण्यासही मदत होते. जेवण केल्यावर लगेच ढसाढसा पाणी पिऊ नये. जेवण झाल्यावर साधारण अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

Web Title: Drinking a glass of water before meal may help reduce weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.