रात्री झोपण्याआधी दूध पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 09:49 AM2022-12-23T09:49:51+5:302022-12-23T09:51:43+5:30

Health Tips : सामान्यपणे असं म्हटलं जातं की, झोपण्याआधी गरम दूध प्यायल्याने चांगली झोप येते. पण हेल्थ एक्सपर्ट्सचं मत आहे की, तुम्ही रात्री झोपण्याआधी दुधाचं सेवन अजिबात करू नये. 

Drinking milk at bedtime every day may not be good for you | रात्री झोपण्याआधी दूध पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य वेळ

रात्री झोपण्याआधी दूध पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य वेळ

googlenewsNext

Health Tips : दूध आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. कारण दुधात भरपूर प्रोटीन आणि कॅल्शिअम असतं. तसेच दुधात व्हिटॅमिन ए, बी2 आणि बी12 हेही असतात. पण काही लोकांना दूध प्यायल्यानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असं लेक्टॉस इंटॉलरेन्सच्या कारणामुळे होतं. लेक्टॉस इंटॉलरेन्स पचनासंबंधी विकार असतो. लेक्टॉस डेअरी उत्पादनांमध्ये आढळणारं एक मुख्य तत्व असतं. 
सामान्यपणे असं म्हटलं जातं की, झोपण्याआधी गरम दूध प्यायल्याने चांगली झोप येते. पण हेल्थ एक्सपर्ट्सचं मत आहे की, तुम्ही रात्री झोपण्याआधी दुधाचं सेवन अजिबात करू नये. 

कॅलिफोर्निया स्थित गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टर पलानीअप्पन मणिक्कम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, 30 पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांमध्ये हळूहळू लॅक्टेज एंजाइमची कमतरता होऊ लागते. ज्याचं कारण त्याचं शरीर दूध पचवण्यात सक्षम नसतं. 
व्हिडीओत त्यांनी सांगितलं की, आपल्या छोट्या आतडीमध्ये लॅक्टेज एंजाइम आढळून येतं जे दुधातील लॅक्टोजला छोट्या छोट्या अणुसारख्या ग्लूकोज आणि गॅलेक्टोजमध्ये तोडण्याचं काम करतं. जेणेकरून ते सहजपणे अवशोषित व्हावं.

30 वयाच्या आसपास आपल्या छोट्या आतडीमध्ये लॅक्टेज एंजाइमचं उत्पादन फार कमी होऊ लागतं. लॅक्टेज एंजाइम विना, दूध थेट मोठ्या आतडीमध्ये पोहोचतं आणि यात असलेल्या बॅक्टेरियाने अपचनच्या समस्येचा सामना करावा लागतो. याचा प्रभाव पोटतील चरबीवर होतो.
ते म्हणाले की, लोकांनी झोपण्याच्या ठीक आधी दुधाचं सेवन करू नये. कारण याने पचनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ते हेही म्हणाले की, जर तुम्हाला पचनासंबंधी काही समस्या नसेलही तरीही तुम्ही झोपण्याच्या ठीक आधी दूध पिऊ नये. याने आजार तुमच्या पोटाच्या आजूबाजूला फिरत राहतील. 

डॉ. पलानीअप्पन म्हणाले की, तुम्ही जेवण केल्यावर लगेच दुधाचं सेवन करू नये. झोपण्याआधी दुधाचं सेवन कराल तर तुमची इन्सुलिन लेव्हल वाढू शकते. कारण दुधात कार्बोहाइड्रेट असतात जे सरकेडिअन रिदमला डिस्टर्ब करतात. जर तुम्हाला रात्री दूध पिणं पसंत असेल तर प्रयत्न करा की, झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी याचं सेवन करावं.

Web Title: Drinking milk at bedtime every day may not be good for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.