उन्हाळ्यात लस्सी पिण्याचे मिळतात एकापेक्षा एक फायदे, वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 09:52 AM2023-04-12T09:52:44+5:302023-04-12T09:53:06+5:30
Benefits Of Drinking Sweet Lassi: यात सोडिअम, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे तुमचं पचन तंत्र मजबूत होतं. तसेच याने हाडेही मजबूत होतात.
Benefits Of Drinking Sweet Lassi: उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक दही किंवा लस्सी किंवा छासचं अधिक सेवन करतात. थंड वाटण्यासोबतच यांचे शरीराला अनेक फायदेही मिळतात. खासकरून गोड लस्सी अधिक फायदेशीर मानली जाते. कारण यात सोडिअम, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे तुमचं पचन तंत्र मजबूत होतं. तसेच याने हाडेही मजबूत होतात. इतकंच नाही तर उन्हाळ्यात गारेगार लस्सी पिणं पोटासाठी फार फायदेशीर असतं. याचं कारण लस्सीमध्ये इलेक्ट्रोलाइट असतात जे शरीरात पाणी कमी होऊ देत नाहीत. चला जाणून घेऊ फायदे...
पचन तंत्र होतं मजबूत -
उन्हाळ्यात लस्सी प्यायल्याने पचन तंत्र मजबूत होतं आणि याने तुमचं पोट हेल्दी राहतं. लस्सीमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे तुमच्या पोटाला बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून दूर ठेवतात.
हाडे होतात मजबूत
या दिवसांमध्ये लस्सी प्यायल्याने हाडेही मजबूत ठेवण्यास मदत मिळते. सोबतच मांसपेशींमधील वेदनाही दूर होतात. लस्सीमध्ये कॅल्शिअम असतं जे थकवा दूर करण्याचं काम करतं. इतकंच नाही तर याचं सेवन केल्याने दातही मजबूत होतात.
उन्ह लागत नाही
उन्हाळ्यात लस्सी प्यायल्याने तुम्हाला उन्ह लागण्याचा धोका कमी असतो. यासाठी घरातून बाहेर निघण्याआधी तुम्ही एक ग्लास लस्सी प्यावी. याने तुमचा उन्हापासून बचाव होईल. तेच काही लोकांना उन्हाळ्यात डोकेदुखीची समस्या असते, अशा लोकांनी सुद्धा लस्सीचं सेवन करावं.
वजन होतं कमी
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही उन्हाळ्यात लस्सीचं सेवन नक्की केलं पाहिजे. याने तुम्हाला वजन कमी करण्यास फार मदत मिळेल. पण कमी करण्यासाठी साधं किंवा काळं मीठ टाकूनच लस्सी बनवा.
लिव्हर राहतं निरोगी
लिव्हरसाठी लस्सी फार फायदेशीर असते. कारण यातील पोषक तत्व लिव्हरला हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. दह्यात असलेलं प्रोबायोटिक्स नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीजला रोखण्याचं काम करतं.