चहा पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'याचा' तर तुम्ही आयुष्यातही विचार केला नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 10:15 AM2020-01-10T10:15:35+5:302020-01-10T10:15:56+5:30
चहाच्या शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभ्यासकांनी एका रिसर्च केला असून त्यातून एक आश्चर्यजनक दावा करण्यात आला आहे.
चहाच्या शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभ्यासकांनी एका रिसर्च केला असून त्यातून असा दावा करण्यात आला आहे की, आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा चहाचं सेवन केल्यावर तुमचं आयुष्य तर वाढेलच सोबतच हेल्दीही राहील. चीनची राजधानी पेइचिंग येथील चायनीज अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेजमध्ये हा रिसर्च करण्यात आला आहे आणि या रिसर्चचे मुख्य लेखक शिनयान वांग यांच्यानुसार, ज्या लोकांना चहा सेवन करण्याची सवय आहे त्यांना हृदयाशी संबंधित गंभीर आजार तसेच तसेच मृत्यूचा धोका कमी राहतो.
पण कोणता चहा?
वांग यांनी सांगितले की, 'मोठ्या कालावधीपासून ज्या लोकांना चहा पिण्याची सवय आहे आणि जे लोक ग्रीन टी चं सेवन करतात त्यांच्या आरोग्यावर याचा जास्त सकारात्मक प्रभाव बघायला मिळतो'. या रिसर्चचे निष्कर्ष युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंशन कार्डिऑलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. या रिसर्चमध्ये चीनमधील १ लाख ९०२ लोकांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वांनाच हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा कॅन्सरसारख्या आजारांचा कोणताही इतिहास नव्हता.
१ लाख लोकांवर ७ वर्ष रिसर्च
(Image Credit : foxnews.com)
या लोकांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं होतं. एक ग्रुप अशा लोकांचा होता ज्यांना चहाची सवय होती आणि ते आठवड्यातून ३ वेळा किंवा त्यापेक्षा जास्त चहा घेत घेत होते. दुसऱ्या ग्रुपमध्ये चहाची सवय नसलेले लोक होते. म्हणजे हे लोक आठवड्यातून ३ पेक्षा कमी वेळा चहा पित होते किंवा अजिबातच पित नव्हते. या लोकांवर ७ वर्ष लक्ष ठेवण्यात आलं.
चहा पिणाऱ्यांना हृदयरोगाचा धोका २० टक्के कमी
(Image Credit : express.co.uk)
ज्या लोकांना चहा पिण्याची सवय होती त्यांचं केवळ आयुष्यच वाढलं नाही तर त्यांचं आरोग्यही चांगलं होतं. उदाहरणार्थ जर ५० वर्षाची एखादी व्यक्ती आठवड्यातून ३ वेळा किंवा त्यापेक्षा चहा पित होते. त्यांच चहा न पिणाऱ्यांच्या तुलनेत १.२६ वर्षे वय वाढेल आणि त्यांना कोरोनरी हार्ट डिजीज आणि स्ट्रोरसारखे आजारही १.४१ वर्षांनंतर होतील. सोबतच चहाची सवय असणाऱ्यांना हृदयरोगांचा धोका २० टक्के कमी राहतो.
ग्रीन टी च्या सेवनाने हार्ट डिजीजचा धोका २५ टक्के कमी
जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर चांगलं होईल की, तुम्ही दूध आणि विना साखरेचा चहा घ्यावा. इतकेच नाही तर तुम्ही ग्रीन टी चं सेवनही सुरू करू शकता. ग्रीन टी चं सेवन करणाऱ्यांना हार्ट डिजीज, स्ट्रोक, हृदयासंबंधी जीवघेणे आजार आणि मृत्यू होण्याचा धोका २५ टक्के कमी राहतो.
ग्रीन टीमधील पॉलिफेनॉल्स हृदय ठेवतं निरोगी
(Image Credit : womenfitness.net)
अभ्यासकांनुसार, ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल्स अधिक प्रमाणात असतात. ज्याने आपल्या शरीराचा कार्डिवस्क्युलर डिजीजपासून बचाव होतो. सोबतच शरीरात हाय ब्लड प्रेशरही कमी राहतं. त्यामुळे जास्त आयुष्य जगायचं असेल तर चहा पिणं सुरू करा, पण विना दुधाचा चहा घ्या.