जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय, चूक की बरोबर?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 11:29 AM2019-07-01T11:29:11+5:302019-07-01T11:32:17+5:30
अनेकांना जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय असते. काहींना तर जेवण झाल्या झाल्या चहा हवा असतो. तुम्हालाही अशीच सवय असेल तर याबाबत तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे.
(Image Credit : EVOKE.ie)
अनेकांना जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय असते. काहींना तर जेवण झाल्या झाल्या चहा हवा असतो. तुम्हालाही अशीच सवय असेल तर याबाबत तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा पिणे हा आपल्या लाइफस्टाईलचा भाग आहे. काही लोक जेवण करतानाही चहा पितात. त्यामुळे चहा हा नेहमीच वादाचाही मुद्दा राहिला आहे. तर काही रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, चहा पचन तंत्रासाठी चांगलं असतं. तेच काही रिसर्चनुसार, चहामध्ये असणारं तत्व कॅफीनमुळे आपलं नुकसान होतं. चला जाणून घेऊ याबाबत जरा सविस्तर...
पचन तंत्रावर चहाचा प्रभाव
द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, काही रिसर्चमधून हे समोर आले आहे की, जेवण करताना किंवा जेवण केल्यावर चहा प्यायल्याने पोटात तयार झालेली गॅस बाहेर येण्यास मदत मिळते. ज्याने आपलं पचन तंत्र चांगलं राहतं. पण हेही लक्षात ठेवायला हवं की, सगळ्याच प्रकारचा चहा याबाबत फायदेशीर ठरत नाही. ग्रीन टी, हर्बल टी जसे की, आल्याचा चहा ज्यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि पोलीफेनॉलचं प्रमाण अधिक असतं. हे चहा आपल्या पचन तंत्रासाठी फार फायदेशीर असतात.
(Image Credit : Her.ie)
चहा आपल्या पचन तंत्राला साल्विया, पित्त आणि गॅस्ट्रिक ज्यूस तयार करण्यास मदत करतो. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्सचं प्रमाण अधिक असल्याने हे शक्तीशाली अॅंटी-इंफ्लेमेटरीसारखं काम करतं. ज्याने पचनक्रियेशी संबंधित अनेक कमतरता पूर्ण केल्या जातात.
जेवणानंतर चहा पिण्याचे फायदे आणि नुकसान
१) काही रिसर्च हे सांगतात की, चहामध्ये असणारं फेनोलिक तत्व आपल्या पोटातील आतड्यांच्या आतील भागात आयर्न कॉम्प्लेक्स तयार करून पचनक्रियेत अडचण निर्माण करतं.
(Image Credit : INLIFE Healthcare)
२) असे म्हटले जाते की, जर जेवणासोबत तुम्हला चहा हवा असेल आहारात आयर्न आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. याने तुम्हाला होणारा त्रास टाळला जाईल.
३) आयर्नची कमतरता असलेल्या लोकांनी जेवताना चहा घेऊ नये. असंही आढळलं आहे की, जेवणादरम्यान चहा प्यायल्याने शरीरात कॅटचिनची कमतरता होते.
(Image Credit : Mamiverse)
४) कॅटलिन चहामध्ये आढळणारं एक तत्त्व आहे. ज्याचा आपल्या अनेक सायकॉलॉजिकल कामात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
५) तुम्हाला जेवणासोबत चहा प्यायचाच असेल तर ग्रीन टी किंवा जिंजर टी घेऊ शकता. कारण याने पचनक्रियेला मदत मिळते.