प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्यानेही होतं नुकसान, जाणून घ्या काय टाळावं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 12:36 PM2023-08-07T12:36:17+5:302023-08-07T12:36:46+5:30
Side Effect Of Drinking Too Much Water: काही लोक हायड्रेट राहण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त पाणी पितात. मात्र असं करणं त्यांना महागात पडू शकतं.
Side Effect Of Drinking Too Much Water: आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग हा पाण्यापासून बनलेला असतो. त्यामुळे डॉक्टर नेहमीच सल्ला देतात की, शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये. अशात थोड्या थोड्या वेळाने पाणी पित रहावं. याने शरीर हायड्रेट तर राहतच सोबतच शरीरातील विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून बाहेर पडतात. पण काही लोक हायड्रेट राहण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त पाणी पितात. मात्र असं करणं त्यांना महागात पडू शकतं.
जास्त पाणी पिण्याचे नुकसान
1) अवयवांचं नुकसान
ज्या लोकांना वाटतं की, प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिऊन त्यांना फायदा होऊ शकतो तर ते फार मोठी चूक करत आहेत. असं केल्याने किडनी, हार्ट आणि लिव्हरचं काम वाढतं. अशात या अवयवांचं नुकसान होऊ शकतं.
2) झोप येण्याची समस्या असेल तर...
जेव्हा कुणी प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिऊ लागतात तेव्हा त्यांना पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागतं. खासकरून रात्रीच्या वेळी असं झाल्याने झोपमोड होते. तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी लघवीच्या रंगाकडे लक्ष द्या. जर लघवीचा रंग हलका पिवळा असेल तर तुम्ही बरोबर पाणी पित आहात, पण जर लघवीचा रंग जास्त पिवळा झाला तर तुम्हाला पाण्याची गरज आहे.
3) जेवल्यावर लगेच पाणी पिणं चूक
तुम्ही जेवण केल्यावर लगेच भरूपूर पाणी पित असाल तर याने डायजेशनमध्ये समस्या होते. कारण जेवण केल्यावर लगेच अनेक प्रकारचे डायजेस्टिव अॅसिड रिलीज होतात. जे पाणी प्यायल्याने कमजोर होतात.
4) हेवी एक्सरसाइजनंतर...
जे लोक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी हेवी एक्सरसाइज करतात त्यांनी वर्कआउटनंतर लगेच पाणी पिऊ नये. एक्सरसाइजनंतर घाम निघतो, ज्यामुळे शरीरातून इलेक्ट्रोलाइट्स निघतात. जर हे जास्त प्रमाणात निघाले तर समस्या होऊ शकते. हवं तर तुम्ही एक्सरसाइजनंतर नारळाचं पाणी, लिंबू पाणी किंवा फळांचं रस पिऊ शकता.
जास्त पाणी प्यायल्याने मृत्यू
अमेरिकेच्या इंडियाना (Indiana) मधून काही दिवसांआधीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. इथे एक 35 वर्षीय महिलेचा कमी वेळेत जास्त पाणी प्यायल्याने मृत्यू झाला होता. तिने केवळ 20 मिनिटात 2 लीटर पाणी प्यायलं होतं. मृत महिलेचं नाव ऐश्ले समर्स (Ashley Summers) होतं, तिचा मृत्यू वीकेंड ट्रिप दरम्यान झाला होता.