वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचं पाणी, जाणून घ्या पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:52 AM2024-07-16T10:52:18+5:302024-07-16T10:53:47+5:30

Turmeric water : तुम्ही रोज सकाळी चिमुटभर हळद एक ग्लास पाण्यात टाकून रोज सकाळी सेवन केलं तर तुमचं वजन लवकर कमी होईल. इतकंच नाही तर शरीराला सुद्धा अनेक फायदे मिळतील.

Drinking turmeric water daily on empty stomach is very beneficial for our body, know the benefits | वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचं पाणी, जाणून घ्या पद्धत!

वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचं पाणी, जाणून घ्या पद्धत!

Benefits Of Drinking Turmeric Water : हळदीचा वापर भारतीय घरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. हळद ही एक औषधी आहे. हळदीचा वापर करून अनेक आजारांवर उपचार केले जातात. पण याबाबत लोकांना फारच कमी माहीत असतं. जर तुम्ही रोज सकाळी चिमुटभर हळद एक ग्लास पाण्यात टाकून रोज सकाळी सेवन केलं तर तुमचं वजन लवकर कमी होईल. इतकंच नाही तर शरीराला सुद्धा अनेक फायदे मिळतील.

हळदीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-फंगल तत्व असतात जे आपल्या तोंडाची स्वच्छता करतात. हळदीच्या सेवनाने आपली रोग प्रतिकारक क्षमता मजबूतही मजबूत होते. त्याशिवाय पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. म्हणजे सांगायचं झालं तर हळद ही आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी एक खजिना आहे. अशात जाणून घेऊ याचं सेवन कसं करावं.

सकाळी रिकाम्या पोटी करा हळदीचं सेवन

सकाळी रिकाम्या पोटी हळदीचं सेवन करणं सगळ्यात चांगलं मानलं जातं. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात चिमुटभर हळद टाकून प्यायले तर तुम्हाला खूप फायदे मिळतील. कोमट पाण्यात याचं सेवन केलं तर अधिकच चांगलं.

तसेच तुम्ही रात्री सुद्धा एक ग्लास पाण्यात हळद पावडर टाकून ठेवली आणि सकाळी ते कोमट करून प्यायले तरीही चालेल. पाणी पिताना तुम्हाला मलासनच्या पोजिशनमध्ये बसायचं आहे. हळदीचं पाणी तोंडात फिरवून हळूहळू सेवन करावं. तसेच याचीही काळजी घ्या की, हळदीचं पाणी प्यायल्यावर लगेच काही खाऊ किंवा पिऊ नका.

शरीराला काय होतील फायदे?

- हे पाणी रोज प्याल तर तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.

- हळदीच्या पाण्याने पनच तंत्र चांगलं होतं आणि पोटही साफ होतं.

- हळदीच्या पाण्याने आतड्या साफ होतात.

- शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी हे पाणी फायदेशीर असतं.

- हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्व असतं जे शरीराच्या आतील सूज कमी करण्यास मदत करतं.

- यात आढळणाऱ्या अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटने त्वचा चांगली होते आणि शरीरातील फ्री रॅडिकल्‍स नष्ट होतात जे शरीराचं नुकसान करतात.

- हळदीच्या पाण्याचं सेवन केल्याने किंवा वेगवेगळ्या पदार्थांमधून याचं सेवन केल्याने शरीराचा इन्फेक्शनपासून बचाव होतो.

Web Title: Drinking turmeric water daily on empty stomach is very beneficial for our body, know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.