पिण्याच्या पाण्याची एक्स्पायरी डेट असते?; आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर 'हे' ठेवा लक्षात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 03:39 PM2024-08-12T15:39:02+5:302024-08-12T15:42:06+5:30

पाण्याला एक्स्पायरी डेट असते का?, जर असेल तर ती साधारण किती दिवसांची असते?, पाणी खराब होतं का? असे प्रश्न अनेकांना पडतात. सध्या सर्वत्र पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात.

drinking water also has expiry date 90 percent of people dont know this about bottled water expiry dates | पिण्याच्या पाण्याची एक्स्पायरी डेट असते?; आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर 'हे' ठेवा लक्षात

पिण्याच्या पाण्याची एक्स्पायरी डेट असते?; आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर 'हे' ठेवा लक्षात

पाण्याला एक्स्पायरी डेट असते का?, जर असेल तर ती साधारण किती दिवसांची असते?, पाणी खराब होतं का? असे प्रश्न अनेकांना पडतात. सध्या सर्वत्र पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात. शहरापासून गावापर्यंत पाणी बाटल्यांमध्ये भरून विकलं जातं आणि पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेटही लिहिलेली असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याला एक्सपायरी डेट नसते. अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्याद्वारे पाणी शुद्ध केलं जातं.

पाणी खराब होऊ शकतं. त्यामुळे ते स्वच्छ केलं जातं. पाण्याच्या बाटल्यांवर लिहिलेली एक्स्पायरी डेट ही पाण्याची नसून पाण्याच्या बाटल्यांची एक्स्पायरी डेट असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाण्याच्या बाटल्या या प्लास्टिकच्या असतात आणि ठराविक वेळेनंतर प्लास्टिक हळूहळू पाण्यात विरघळू लागतं.

कालांतराने, मायक्रोप्लास्टिक्स बाटलीमध्ये जाऊ शकतात किंवा बाटलीचं प्लास्टिक कमकुवत होऊ शकतं. त्यामुळे बाटलीच्या वापरावर मर्यादा असतात. पाण्यात बॅक्टेरिया किंवा केमिकल्स मिक्स झाल्यास ते अशुद्ध, खराब होऊ शकतं. परंतु शुद्ध पाणी नेहमीच पिण्यायोग्य असतं. त्यामुळे पाण्याची एक्सपायरी डेट नाही असा याचा स्पष्ट अर्थ आहे. 

बाटलीबंद पाणी प्यायल्यास एक्सपायरी डेट असते हे लक्षात ठेवा. पाणी सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी, बाटलीची नीट तपासणी करा आणि कोणतंही नुकसान दिसत असल्यास ते पाणी पिऊ नका. तरीही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पाणी हे एका अणूपासून (H2O) बनलेलं आहे जे अत्यंत स्थिर आहे.

सामान्य आणि चांगल्या परिस्थितीत, पाण्यावर कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही आणि या स्थितीत कोणतेही बॅक्टेरिया किंवा इतर सूक्ष्मजीव त्यात वाढू शकत नाहीत. परंतु जर कोणत्याही प्रकारची अशुद्धता पाण्यात मिसळली असेल, जसं की बॅक्टेरिया किंवा केमिकल्स तर ते खराब होऊ शकतात. परंतु शुद्ध पाणी नेहमीच पिण्यायोग्य राहते आणि त्याची एक्सपायरी डेट नसते.
 

Web Title: drinking water also has expiry date 90 percent of people dont know this about bottled water expiry dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.