सकाळी ब्रश करण्याआधी पाणी पिणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 06:44 PM2022-07-28T18:44:24+5:302022-07-28T18:44:52+5:30
Drinking Water For Health: प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांच्यानुसार, 'एक निरोगी व्यक्तीने एका दिवसात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं. याने शरीर हायड्रेट राहतं आणि उन्हाळ्यात असं करणं जास्त गरजेचं असतं.
Drinking Water For Health: सगळेजण सामान्यपणे रोज सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश करतात. ज्याने दातांची आणि तोंडाची स्वच्छता होते. ब्रश केल्याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते. आपण सर्वांनीच ऐकलं असेल की, ब्रश केल्याशिवाय नाश्ता करू नये. कारण तेव्हा कीटाणू आपल्या तोंडातच राहतात आणि अन्नाद्वारे पोटात पोहोचतात. याने पोटात गडबड होऊ शकते. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, ब्रश केल्याविना सकाळी पाणी प्यावं की नाही?
प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांच्यानुसार, 'एक निरोगी व्यक्तीने एका दिवसात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं. याने शरीर हायड्रेट राहतं आणि उन्हाळ्यात असं करणं जास्त गरजेचं असतं. हेच कारण आहे की, जेव्हा सकाळी झोपेतून उठल्यावर तहान लाहते तेव्हा आपण याचा विचार करत नाही की, ब्रश केला आहे की नाही.
विना ब्रश करता पाणी पिण्याचे फायदे
सकाळी झोपे झोपेतून उठल्यावर तुम्हाला जर जोरात तहान लागली असेल आणि विना ब्रश करता तुम्ही पाणी प्यायलात तर याने नुकसान होणार नाही. उलट याचे फायदेच होतात.
- सकाळी ब्रश करण्याआधी तुम्ही एक ग्लास पाणी प्यायलात तर याने इम्यूनिटी बूस्ट होईल आणि कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून तुमचा बचाव होईल.
- ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्याने डायजेस्टिव सिस्टीम चांगलं होतं. सोबतच याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते.
- हे तर अनेकांना माहीत नसेल की, ब्रश न करता पाणी प्यायल्याने तुमचे केस स्ट्रॉंग आणि शायनी होतात.
- अशाप्रकारे पाणी प्यायल्याने चेहरा आणि त्वचेवर फ्रेशनेस येतो.
- जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल तर सकाळी झोपेतून उठताच पाणी प्यावे आणि यासाठी ब्रश करण्याची वाट बघू नये.
- अनेक हेल्थ एक्सपर्ट मानतात की, अशाप्रकारे पाणी प्यायल्याने लठ्ठपणा हळूहळू कमी होऊ लागतो.
- ब्रश न करता पाणी प्यायल्याने बद्धकोष्टता, अॅसिडिटीसारख्या पोटाच्या समस्याही होत नाहीत.