प्लास्टिक बाटलीतील पाणी पिताय? मधुमेह, पोटाचे वाढू शकतात आजार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 11:20 AM2022-12-24T11:20:53+5:302022-12-24T11:21:10+5:30

अनेक लोकांची कॉमन सवय असते की कोल्ड्रिंक विकत घेतलेले पाणी पिल्यास रिकामी बाटली घरी आणायची, त्यात पाणी साठवायचे.

Drinking water from plastic bottles Diabetes stomach diseases can increase know details | प्लास्टिक बाटलीतील पाणी पिताय? मधुमेह, पोटाचे वाढू शकतात आजार 

प्लास्टिक बाटलीतील पाणी पिताय? मधुमेह, पोटाचे वाढू शकतात आजार 

googlenewsNext

मुंबई : आजकाल शहरी भागासह ग्रामीण भागातही पाणी साठविण्यास आणि पिण्यास प्लास्टिकच्या बाटल्या
सर्रास वापरल्या जातात. हेच नाही तर अनेक लोकांची कॉमन सवय असते की कोल्ड्रिंक विकत घेतलेले पाणी पिल्यास रिकामी बाटली घरी आणायची, त्यात पाणी साठवायचे. मात्र, ही सवय केवळ पर्यावरणासाठी नुकसानकारक नाही तर यातून आरोग्यालाही इजा पोहोचवते. 

एन्व्हायर्मेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात समोर आलं, की रोज आठ प्रकारच्या प्लास्टिकचे उत्पादन होते, यात सर्व दाव्यांनंतरही ७४ टक्के प्लास्टिक विषारी असल्याचे सिद्ध झाले. लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने प्लास्टिक बाटल्यांचा वापर केला जातो.

काय आहेत धोके?
अनेक कंपन्यांकडून बीपीए फ्री प्लास्टिकचा वापर करतात. विविध प्रकारच्या प्लास्टिक बाटल्या बनवण्यास विविध रसायो वापरली जातात. ही रसायने मानवी शरीरासाठी हानिकारक आहेत. घातक रसायने पिण्याच्या पाण्यात मिसळतात. 

पर्यावरणासाठी घातक 
प्लास्टिक विघटित न होणारे असते. यांना नष्ट करण्यासाठी खास प्रक्रियेची गरज असते. या बाटल्या वापरून फेकल्या तर त्यांचा पुनर्वापर नीट होत नाही. मग प्लास्टिकचा कचरा पृथ्वीवर वाढतो. प्लास्टिकऐवजी धातूच्या बाटल्या वापरणे योग्य असते.

प्लास्टिक बॉटलचा वापर एकदाच हवा
प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या. तेथील त्रिकोण हे दर्शवतात की, त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लास्टिक वापरले गेले आणि ती बाटली किती वेळा रीयूज करता येऊ शकते. जेव्हा तुम्ही बाजारात जाल तेव्हा या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त तुमच्या प्लास्टिक किंवा PET बाटलीच्या तळाशी असलेले अंक आणि मार्कर समजून घ्यायचे आहेत. लेबल असलेली बाटली फक्त एका वापरासाठी सुरक्षित असते. 

बीपीए रसायने प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिऊन रक्तप्रवाहात प्रवेश करतात. अशा परिस्थितीत ते हृदय कमकुवत करते. याचा परिणाम शरीरातील रक्ताभिसरणांवरही होतो. प्लास्टिकमध्ये उपस्थित बीपीए न जन्मलेल्या मुलाच्या (गर्भात असल्येल्या) वाढीवरही परिणामकारक ठरते.
- डॉ. प्रथमेश कानडे, हृदयरोगतज्ज्ञ

Web Title: Drinking water from plastic bottles Diabetes stomach diseases can increase know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी