एक्सरसाईजनंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 03:04 PM2024-08-30T15:04:07+5:302024-08-30T15:04:56+5:30
Drinking water after exercise side effects :बरेच लोक एक्सरसाईज केल्यानंतर लगेच पाणी पितात. असं करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Drinking water after exercise side effects : एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात. पण सोबतच काही लोक एक्सरसाईज दरम्यान काही चुका करतात ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. बरेच लोक एक्सरसाईज केल्यानंतर लगेच पाणी पितात. असं करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जास्त पाणी पिऊ नका
तुम्ही जर खूप जास्त एक्सरसाईज केली असेल आणि अधिक घाम गेल्यामुळे जास्त तहान लागली असेल तर पाणी एक-एक घोट करून प्यावं. एक्सरसाईजनंतर लगेच ढसाढसा पाणी पिणं महागात पडू शकतं.
पोट बिघडू शकतं
एकाचवेळी खूप जास्त पाणी प्यायल्याने पोटात गडबड होऊ शकते. कधी कधी असं केल्याने हायपोनेट्रेमियाही होऊ शकतो.
काही वेळ थांबून प्यावं पाणी
एक्सरसाईज केल्यावर लगेच पाणी पिऊ नका. काही वेळ थांबून आधी रिलॅक्स व्हा आणि नंतर हळूहळू पाणी प्या. याने शरीर शांत होण्यास मदत मिळेल.
हृदयाला द्या आराम
एक्सरसाईज केल्यानंतर हृदयाला काही वेळ आराम द्यायला हवा. अचानक पाणी प्यायल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि हृदयावर अधिक दबाव पडतो. ज्यामुळे हृदयासंबंधी समस्या होऊ शकते.
एक्सरसाईज करण्याचे फायदे
वजन कमी होतं
मूड चांगला राहतो
व्यायामाने ऊर्जा वाढते
झोप चांगली लागते
हृदयरोगाचा धोका कमी होतो
डिप्रेशन, चिंता दूर होते
शरीर आणि हाडं मजबूत राहतात