सकाळी ब्रश केल्याशिवाय पाणी पिणं योग्य की अपायकारक? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 05:34 PM2022-06-08T17:34:07+5:302022-06-08T17:37:42+5:30

आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्या शरीराला रात्रभर ७ ते ८ तास पाणी मिळत नाही. अशा स्थितीत शरीरातील पाणी कमी पडण्याची शक्यता वाढते, पण सकाळी उठून ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी खरेच चांगले आहे का?

drinking water in the morning before brushing is harmful or helpful know the truth | सकाळी ब्रश केल्याशिवाय पाणी पिणं योग्य की अपायकारक? जाणून घ्या सत्य

सकाळी ब्रश केल्याशिवाय पाणी पिणं योग्य की अपायकारक? जाणून घ्या सत्य

googlenewsNext

उन्हाळ्यासह कोणत्याही ऋतुमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी रोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवे. पाणी पिण्याने शरीर हायड्रेट तर राहतेच, त्यासोबत अनेक आजारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत मिळते. अनेकांचा असा विश्वास आहे की, सकाळी ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामागे हेही तथ्य आहे की जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्या शरीराला रात्रभर ७ ते ८ तास पाणी मिळत नाही. अशा स्थितीत शरीरातील पाणी कमी पडण्याची शक्यता वाढते, पण सकाळी उठून ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी खरेच चांगले आहे का, जाणून (Drinking Water Benefits Before Brush) घेऊया.

पचन गती वाढते -
बरेच लोक सकाळी उठून ब्रश न करता पाणी पितात. असे केल्याने आरोग्य चांगले राहते. सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने शरीराची पचनशक्ती वाढते, त्यामुळे आपण दिवसभरात खाल्लेले अन्न चांगले पचते. याशिवाय सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार दूर होतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त -
सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हिवाळ्यात, खोकला किंवा सर्दी यांसारख्या मौसमी आजारांची लक्षणे दिसू लागल्यास, एखाद्या व्यक्तीने सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. याशिवाय ब्रश न करता पाणी प्यायल्याने त्याचा त्वचेवर आणि केसांवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

उच्च रक्तदाब टाळण्यासाठी उपयुक्त -
सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने हाय बीपी किंवा लो बीपी सारख्या समस्या टाळता येतात. सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याशिवाय सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने लठ्ठपणाची समस्या दूर होते.

तोंडाची दुर्गंधी दूर करणे -
ज्या लोकांना श्वासाच्या दुर्गंधीची समस्या आहे, अशा लोकांनी सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी प्यावे. तोंडात लाळेच्या कमतरतेमुळे, आपले तोंड पूर्णपणे कोरडे होते, ज्यामुळे हॅलिटोसिसची समस्या उद्भवते. तोंडात लाळेच्या कमतरतेमुळे जीवाणू तयार होतात. त्यामुळे सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास या समस्येपासून सुटका मिळेल.

Web Title: drinking water in the morning before brushing is harmful or helpful know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.