जेवताना पाणी पिण्याची सवय अशी पडू शकते महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 10:56 AM2018-06-18T10:56:32+5:302018-06-18T10:56:32+5:30
नुकत्याच एका संशोधनातून हे समोर आले आहे की, जेवताना पाणी पिणे आरोग्यासाठी फारच घातक आहे.
(Image Credit : doctorstime.com)
मुंबई : अनेकांना जेवण करताना पाणी पिण्याची सवय असते. तर काही लोक हे जेवण झाल्याझाल्या ढसाढसा पाणी पितात. तुम्हालाही ही सवय असेल तर ही सवय वेळीच बदला. नुकत्याच एका संशोधनातून हे समोर आले आहे की, जेवताना पाणी पिणे आरोग्यासाठी फारच घातक आहे.
अनेकजण पिझ्झा, भटूरे, बरगर खातांना सॉफ्ट ड्रिंक पितात. त्यांना असं वाटतं की, असे केल्यास त्याना ते पदार्थ डायजेस्ट होतील. पण असा विचार करणे चुकीचे आहे. याने त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
जेवण करताना पाणी प्यायल्यास शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. जेवताना पाणी प्यायल्यास शरीरातील इन्सुलिनचा स्तर वाढतो. याने पचनक्रियेवर प्रभाव पडतो. जेवताना पाणी प्यायल्यास अन्न पचनाची प्रकिया हळुवार होते. याने पोटाचे विकार होतात.
आपण जे खातो त्यावर जठारात पचनक्रिया होते. जठराग्नी ही खाल्यानंतर एक तासांपर्यंत प्रबळ राहते. आयुर्वेदानुसार जठराची अग्नी ही पचनक्रिया करते. तुम्ही लगेचच पाणी प्यायल्याने जेवण पचण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदाने जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे.
पाणी प्यायल्याने ही जठराग्नी समाप्त होते. ही जठराग्नी जेवण पचल्यानंतर शरीराला मुख्य उर्जा आणि प्राण प्रदान करते. त्यामुळे जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही. असे केल्यास मोठ्या प्रमाणात गॅस आणि अॅसिडी निर्माण होतो. त्याने एक दुष्टचक्र सुरू होते. महर्षि वाघभट्ट यांनी १०३ रोगांचा उल्लेख केला आहे. जे भोजन केल्यानंतर पाणी प्यायल्याने होतात.
या गोष्टींची घ्या काळजी
1) जेवण करताना अधिक तिखट किंवा मसालेदार पदार्थ खात असाल तर थोडं पाणी प्यावे.
2) जर जेवण केल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास अपचनाचा त्रास होणार नाही.
3) जेवण योग्य प्रकारे चावून खाल्लास पचन चांगलं होतं.
4) जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणाआधी भरपूर पाणी प्यावे.