जेवण करताना पाणी प्यायल्याने काय होतं? वाचाल तर लगेच सोडाल 'ही' सवय...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 10:38 AM2024-09-02T10:38:41+5:302024-09-02T10:39:39+5:30

Ayurveda Water Drinking Tips : आयुर्वेदात पाणी कसं प्यायचं याचेही काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावं हेही आयुर्वेदात सांगितलं आहे.

Drinking water with meals is good or bad for health | जेवण करताना पाणी प्यायल्याने काय होतं? वाचाल तर लगेच सोडाल 'ही' सवय...

जेवण करताना पाणी प्यायल्याने काय होतं? वाचाल तर लगेच सोडाल 'ही' सवय...

Ayurveda Water Drinking Tips : रोज तीन किंवा दोन वेळा जेवण करणं ही कॉमन बाब आहे. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण करणं फार महत्वाचं आहे. ज्यामुळे आरोग्य आणि शरीरही चांगलं राहतं. आयुर्वेदाचा वापर फार पूर्वीपासून भारतात अनेक उपचारांसाठी केला जातो. आयुर्वेदात पाणी कसं प्यायचं याचेही काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावं हेही आयुर्वेदात सांगितलं आहे.

जास्तीत जास्त लोक जेवण करताना पाणी पिण्याची एक चूक करतात. बरेच लोक जेवण करता करता पाणी पितात आणि बरेच लोक जेवण झाल्यावर लगेच भरपूर पाणी पितात. मात्र, आयुर्वेदानुसार, जेवताना पाणी पिणे आरोग्यासाठी फारच घातक आहे. जेवण करताना पाणी पिणं किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणं किती घातक असतं हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जेवताना पाणी पिण्याचे नुकसान?

जेवण करताना पाणी प्यायल्यास शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. जेवताना पाणी प्यायल्यास शरीरातील इन्सुलिनचा स्तर वाढतो. याने पचनक्रियेवर प्रभाव पडतो. जेवताना पाणी प्यायल्यास अन्न पचनाची प्रकिया हळुवार होते. याने पोटाचे विकार होतात. 

आपण जे खातो त्यावर जठारात पचनक्रिया होते. जठराग्नी ही खाल्यानंतर एक तासांपर्यंत प्रबळ राहते. आयुर्वेदानुसार जठराची अग्नी ही पचनक्रिया करते. तुम्ही लगेचच पाणी प्यायल्याने जेवण पचण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदाने जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे.

जेवताना पाणी प्यायल्याने ही जठराग्नी समाप्त होते. ही जठराग्नी जेवण पचल्यानंतर शरीराला मुख्य उर्जा आणि प्राण प्रदान करते. त्यामुळे जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही. असे केल्यास मोठ्या प्रमाणात गॅस आणि अॅसिडी निर्माण होतो. त्याने एक दुष्टचक्र सुरू होते. महर्षि वाघभट्ट यांनी १०३ रोगांचा उल्लेख केला आहे. जे भोजन केल्यानंतर पाणी प्यायल्याने होतात. 

जेवताना पाणी पिण्याच्या टिप्स

1) आयुर्वेदात सांगितलं आहे की, जेवणाआधी कोमट पाण्याचे काही घोट प्यावे. याने डायजेस्टिव सिस्टीम अक्टिव होते आणि जठराग्नी तयार होते. असं केल्याने पचनक्रिया चांगली होते.

2) तसेच जेवणाता कोमट पाण्याचे छोटे घोट घेतल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि अॅसिडही वाढत नाही. जेवताना थंड पाणी टाळा. याने जठराग्नी विझते.

3) आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर पाणी पिण्यासाठी साधारण 30 मिनिटे थांबावं. याने पचनक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय होते.

4) जेवण केल्यावर लगेच पाणी प्याल तर याने पचनक्रिया प्रभावित होते. ज्यामुळे तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा पोटात अ‍ॅसिड वाढण्याची समस्या होऊ शकते.

या गोष्टींची घ्या काळजी

1) जेवण करताना अधिक तिखट किंवा मसालेदार पदार्थ खात असाल तर थोडं पाणी प्यावे. 

2) जर जेवण केल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास अपचनाचा त्रास होणार नाही. जेवण योग्य प्रकारे चावून खाल्लास पचन चांगलं होतं. 

4) जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणाआधी भरपूर पाणी प्यावे. 

योग्यवेळी पाणी पिण्याचे फायदे

- जेवण केल्यावर एक तासांनंतर पाणी प्यायल्याने वजन कंट्रोलमध्ये राहतं. 

- योग्यवेळी पाणी प्यायल्यास पचनक्रिया चांगली राहते. 

- पोटात गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या होत नाही.

- शरीरात अन्नातील पोषक तत्व चांगल्याप्रकारे शोषूण घेतं.

- याने झोपली चांगली लागते. 

Web Title: Drinking water with meals is good or bad for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.