आता एका कॅप्सूलने कंट्रोल होणार Diabetes, पोटात इंजेक्शन घेण्याचा त्रास वाचणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 10:59 AM2019-02-12T10:59:43+5:302019-02-12T11:02:23+5:30
टाइप २ डायबिटीजने पीडित रुग्ण जे इन्सुलिनचं इंजेक्शन घेतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. संशोधकांनी एक अशी कॅप्सूल तयार केली आहे.
टाइप २ डायबिटीजने पीडित रुग्ण जे इन्सुलिनचं इंजेक्शन घेतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. संशोधकांनी एक अशी कॅप्सूल तयार केली आहे, जी खाल्ल्यावर तुम्हाला इन्सुलिनचं इंजेक्शन घेण्याची गरज पडणार नाही. ही कॅप्सूल एका ब्लूबेरी आकाराची असेल. अर्थाकच डायबिटीजच्या रुग्णांसाठी याचा फायदा होणार आहे. कारण याने अनेकांचा नेहमी इंजेक्शन घेण्याचा त्रास वाचणार आहे.
डायबिटीज एक गंभीर आजार असून दिवसेंदिवस अनेकजण या आजाराच्या जाळ्यात अडकत आहेत. कमी वयातही अनेकांना हा आजार होत आहे. पण दुर्देवाने यावर ठोस असा कोणताही उपचार नाहीये. केवळ चांगली डाएट आणि एक्सरसाइजच्या माध्यमातून हा आजार कंट्रोल केला जाऊ शकतो. डायबिटीज -१ ने पीडित रुग्णांना जगण्यासाठी नियमितपणे इन्सुलिनचं इंजेक्शन घेण्याची गरज पडते. त्यामुळे आता ही कॅप्सूल आल्याने या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
मॅसेच्युसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि हॉर्वर्डच्या संशोधकांनुसार, या कॅप्सूलमध्ये सोमा नावाचं एक लहान डिव्हाइस ठेवण्यात आलं आहे. ज्यात इन्सुलिन किंवा इतर औषधे भरली जाऊ शकता. पोटात गेल्यावर सोमामधील औषधं शरीरात रिलीज होतील. त्यानंतर हे छोटं डिव्हाइस मलाशयाद्वारे शरीरातून बाहेर पडणार.
सध्या या उपकरणाचा प्रयोग डुक्कर आणि उंदरांवर केला जात आहे. तीन वर्षात मनुष्यांवरही याचा प्रयोग केला जाणार आहे. इतरही यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या डिव्हाइसला एक मोठं यश मानलं आहे.
भारतात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या
WHO नुसार, भारतात ३१, ७०५, ००० डायबिटीजचे रुग्ण आहेत आणि २०३० पर्यंत यांची संख्या १०० टक्क्याच्या दराने ७९, ४४१, ००० पर्यंत पोहोचेल.
फायदेशीर एक्सरसाइज
इंग्लंडच्या ग्लासगो विश्वविद्यालयच्या संशोधकांनी सांगितले की, एका आठवड्यात केवळ १५ मिनिटे एक्सरसाइज करून डायबिटीज २ ला दूर केलं जाऊ शकतं. हा रिसर्च एक्सपरिमेंटल फिजिओलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे. रिसर्चनुसार, सहा आठवडे केवळ १५ मिनिटे वर्कआउट केल्याने इंसुलिन संवेदनशीलतेमध्ये सुधारणा होते. इतकेच नाही तर याने पुरुषांचे मसल्स साइज आणि क्षमताही वाढते.