शेवग्याच्या शेंगाचे रुचकर लोणचे; आहे इम्युनिटी बुस्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 02:59 PM2021-05-20T14:59:56+5:302021-05-20T15:03:14+5:30
आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची अशी पाककृती दाखवणार आहोत जी खाल्ल्यावर तुम्ही बोट तर चाटत रहालच पण तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.
भारताच्या खाद्यसंस्कृतीत जितकी भारतात राज्य तितकीच वैविध्यपूर्ण. सध्या कोरोनाकाळात (corona) रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढवण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असाल पण भारताच्या खाद्यसंस्कृतीतच याचे उत्तर लपलेले आहे. सी व्हिटऍमिनयुक्त (c vitamin) शेवग्याच्या शेंगा म्हणजे या काळात रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवण्याचा स्वादिष्ट उपाय. आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची अशी पाककृती दाखवणार आहोत जी खाल्ल्यावर तुम्ही बोट तर चाटत रहालच पण तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.
शेवग्याच्या शेगांचं लोणचं
तुम्ही ऐकलही नसेल पण शेवग्याच्या शेंगाच लोणचं दक्षिण भारतात तयार केलं जातं. सध्याच्या कोरोनाकाळात शेवग्याच्या शेंगाना मागणी वाढली आहे. त्यामुळे शेवग्याचं हे लोणचं खास तुमच्यासाठी...
साहित्य
मेथी
हिंग
बडीशेप
तेल
व्हिनेगर
आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे शेवग्याच्या शेंगा
कृती
एका भांड्यात किंवा कुकरला शेवग्याच्या शेंगा उकडून घ्या. शेवग्याच्या शेंगा उकडल्यामुळे त्यात मसाले व्यवस्थित मिक्स होतील आणि त्या चोखून खाताना तुम्हाला वेगळीच चव लागेल. त्यानंतर गरम तव्यावर तेल तापवावे. त्यात हिंग, बडिशेप, मेथी घालून फोडणी तयार करावी.
शेवग्याच्या उकडलेल्या शेंगा या फोडणीमध्ये मुरवाव्यात. वरून व्हिनेगर टाकावे. हे लोणचे बरणीत भरून ठेवावे. हे लोणचे ३ दिवस टिकते.
शेवग्याच्या शेंगांचे फायदे
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती (Immunity)सी व्हिटॅमिनयुक्त पदार्थ खाण्याकडे सर्वांचा ओढा असतो. शेवग्याच्या शेंगामध्ये सी व्हिटॅमिन म्हणजेच क जीवनसत्व मोठ्याप्रमाणावर असते. तसेच यामध्ये पोटॅशियम, आयरन, मॅग्नीशियम, कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन, कॅल्शियम, व्हीटॅमिन-ए आणि बी अशी पोषकतत्वे असतात. या सर्वांचा उपयोग कोरोनाकाळात इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये होतो. यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळेही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
मुतखड्याचा त्रास दूर होतो
शेवग्याचे सुप प्यायल्यामुळे तसेच भाजी खाल्ल्यामुळे मुतखड्याच्या त्रासापासून आराम मिळतो. त्यामुळे मुतखडा बाहेर शरीराच्या बाहेर पडतो असा दावा केला जातो.
केस मजबूत होतात
शेवग्याच्या फुलांचा उपयोग केस चमकदार व मजबूत करण्यासाठी केला जातो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शेवग्याच्या फुलांचा चहा केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे.