कुत्र्यांनी चावा घेतल्याने आठ लोकांचा मृत्यू

By admin | Published: July 20, 2015 11:59 PM2015-07-20T23:59:29+5:302015-07-20T23:59:29+5:30

नागरिकांत दहशत: ४,६५१ लोकांना कु त्र्यांनी घेतला चावा!

Due to bites of dogs, eight people die | कुत्र्यांनी चावा घेतल्याने आठ लोकांचा मृत्यू

कुत्र्यांनी चावा घेतल्याने आठ लोकांचा मृत्यू

Next
गरिकांत दहशत: ४,६५१ लोकांना कु त्र्यांनी घेतला चावा!
नागपूर : जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, गेल्या सहा महिन्यातच तब्बल ४,६५१ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यात हिंगणा तालुक्यातील आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
मोकाट कुत्र्यांची ग्रामीण भागात चांगलीच दहशत आहे. हिंगणा तालुक्यातील ६५९ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला. यातील आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. यात रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत येत असलेल्या गावातील लोकांचा समावेश आहे.
कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जातात. गेल्या सहा महिन्यात ४,६५१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यात कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी :- भिवापूर ४९, हिंगणा ६५९, कळमेश्वर २४३, कामठी ३७५, काटोल ६७०, कुही ३९७, मौदा १३९, नागपूर ग्रामीण १७० नरखेड ३९०, पारशिवनी ५२०, रामटेक १८४, सावनेर ४२७ व उमरेड तालुक्यातील ४१८ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला.
काटोल तालुक्यात सर्वाधिक ६७० लोकांना सहा महिन्यात कुत्र्यांनी चावा घेतला. म्हणजे दररोज चार लोकांना कुत्री चावल्याच्या घटना घडल्या. जिल्ह्याचा विचार करता दररोज २५ लोकांना कुत्री चावण्याच्या घटना घडतात. मोकाट कुत्र्यांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाकडे कोणतीही यंत्रणा नाही. त्यातच नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांना पकडल्यास त्यांना ग्रामीण भागात सोडले जाते. यामुळे अशा कुत्र्यांची संख्या वाढली आहे. (प्रतिनिधी)
चौकट..
६१ लोकांना विंचूचा डंख
गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील ६१ लोकांना विंचूने डंख मारला. यात सर्वाधिक कामठी तालुक्यातील १८ जणांचा समावेश आहे. नरखेड, रामटेक व सावनेर तालुक्यातील प्रत्येकी पाच जणांना विंचूने डंख मारला. विंचूने डंख मारलेल्यांची तालुकानिहाय संख्या अशी :- उमरेड, पारशिवनी प्रत्येकी ३, नागपूर ग्रामीण १, मौदा व कुही प्रत्येकी ६, काटोल ४, हिंगणा व कळमेश्वर प्रत्येकी २ तर भिवापूर तालुक्यात एकाला डंख मारला.

Web Title: Due to bites of dogs, eight people die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.