आईच्या सतर्कतेमुळे चिमुरडा सुखरुप
By admin | Published: August 7, 2016 12:40 AM2016-08-07T00:40:59+5:302016-08-07T00:40:59+5:30
जळगाव : शौचालयाच्या टाकीत (सेफ्टी टँक) पडल्याने चेतन शशिकांत सोनवणे (अडीच वर्षे, रा. दिनकरनगर, जळगाव) हा बालक जखमी झाला. सुदैवाने वेळीच त्याच्या आईने धाव घेऊन सतर्कता दाखवत त्याला बाहेर काढून त्यांच्या शरीरातील पाणी काढल्याने हा चिमुरडा सुखरुप आहे.
Next
ज गाव : शौचालयाच्या टाकीत (सेफ्टी टँक) पडल्याने चेतन शशिकांत सोनवणे (अडीच वर्षे, रा. दिनकरनगर, जळगाव) हा बालक जखमी झाला. सुदैवाने वेळीच त्याच्या आईने धाव घेऊन सतर्कता दाखवत त्याला बाहेर काढून त्यांच्या शरीरातील पाणी काढल्याने हा चिमुरडा सुखरुप आहे. दिनकरनगरमध्ये राहणार्या सोनवणे कुटुंबीयांच्या घरी शौचालयाच्या टाकीचे काम सुरू असून ते जवळपास पूर्ण झाले आहे. केवळ एक भाग उघडा असून शनिवारी सकाळी चेतन हा खेळता खेळता तिकडे गेला व तो टाकीत पडला. त्या वेळी आवाज आल्याने त्याच्या आईर्ने लगेच धाव घेऊन त्याला बाहेर काढले व त्याला पालथेे करून नाका-तोंडातून पाणी काढले. त्यानंतर शेजारच्यांच्या मदतीने त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येऊन त्याच्यावर तातडीचे उपचार करण्यात आले.