मोबाइलमुळे पन्नाशीतच गाठतोय विसरभोळेपणा; खाण्यापिण्यासोबत सवयी ठरताहेत कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 06:59 AM2024-07-21T06:59:53+5:302024-07-21T07:00:02+5:30

जयपूर : पूर्वी ८० वर्षे वयाचा टप्पा पार केल्यानंतर स्मृतिभ्रंशाचा आजार होत असल्याचे दिसायचे. परंतु आता नागरिक पन्नाशीतच विसरभोळेपणा ...

Due to mobile, forgetfulness is reaching fifty; Habits are the cause along with eating and drinking | मोबाइलमुळे पन्नाशीतच गाठतोय विसरभोळेपणा; खाण्यापिण्यासोबत सवयी ठरताहेत कारणीभूत

मोबाइलमुळे पन्नाशीतच गाठतोय विसरभोळेपणा; खाण्यापिण्यासोबत सवयी ठरताहेत कारणीभूत

जयपूर : पूर्वी ८० वर्षे वयाचा टप्पा पार केल्यानंतर स्मृतिभ्रंशाचा आजार होत असल्याचे दिसायचे. परंतु आता नागरिक पन्नाशीतच विसरभोळेपणा सतावू लागल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. ही समस्या जाणवणारे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. खाण्यापिण्यासोबत टीव्ही आणि मोबाइलची सवय याला कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने डॉक्टर हैराण झाले आहेतच; परंतु रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणींमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहेत. 

राजस्थानमधील भिलवाडा येथील महात्मा गांधी हॉस्पिटलचे मनोरुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. वीरभान चंचलानी यांनी सांगितले की, अनेक जण इथे येतात. दिवसभरातून इथे अनेक रुग्ण येतात. ते चांगले पदार्थ खायलाही मागता. खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने तेच पदार्थ पुन्हा मागू लागतात. आपण खाल्ले की नाही, हेही त्यांच्या लक्षात राहत नाही.

काही जण आंघोळ केल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा आंघोळीला जातात. दैनंदिन जीवनातील रोजची कामेही त्यांच्या लक्षात राहत नसल्याचे समोर आले आहे. आजाराचे विश्लेषण करण्यासाठी हॉस्पिटलच्या संशोधन विभागाने ५०० पेक्षा अधिक रुग्णांची माहिती घेतली. (वृत्तसंस्था)

का होतो स्मृतिभ्रंश?
फळे आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलेली कीटकनाशक रसायने कारणीभूत आहेत. एलईडी बल्बचा प्रकाश, टीव्ही आणि मोबाइलचा अधिक वापर यामुळे विसरभोळेपणा वाढतो.

व्हिटॅमिन बी १, बी ६, बी १२ चे प्रमाण कमी झालेल्यांमध्ये ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसतात.

आहेत. लोकांनी खाण्यापिण्यासोबत आपल्या इतर सवयींचाही विचार केला पाहिजे. लक्षण दिसू लागताच तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

गुटखा, तंबाखू सेवन, अनियंत्रित डायबेटिस, मोबाइल रेडिएशन यामुळे ही समस्या वाढते. 

 

Web Title: Due to mobile, forgetfulness is reaching fifty; Habits are the cause along with eating and drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य