'या' ५ कारणांमुळे शरीरात होते हिमोग्लोबिनची कमतरता; आजपासूनच घ्या काळजी, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 12:59 PM2024-08-06T12:59:23+5:302024-08-06T13:05:11+5:30

शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं की एनिमिया नावाचा आजार होतो. अशक्तपणाची अनेक कारणं असू शकतात.

due to these 5 reasons there is deficiency of hemoglobin in the body | 'या' ५ कारणांमुळे शरीरात होते हिमोग्लोबिनची कमतरता; आजपासूनच घ्या काळजी, नाहीतर...

'या' ५ कारणांमुळे शरीरात होते हिमोग्लोबिनची कमतरता; आजपासूनच घ्या काळजी, नाहीतर...

हिमोग्लोबिन हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचं प्रोटीन आहे, जे फुफ्फुसातून शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवतं. शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं की एनिमिया नावाचा आजार होतो. अशक्तपणाची अनेक कारणं असू शकतात, जसं की आयर्नची कमतरता, व्हिटॅमिन्सची कमतरता, जास्त रक्तस्त्राव इ. हिमोग्लोबिनच्या कमतरतेची मुख्य कारणं आहेत त्याबाबत जाणून घेऊया...

हिमोग्लोबिनच्या कमतरतेची प्रमुख कारणं

आयर्नची कमतरता 

आयर्न हिमोग्लोबिनचा मुख्य घटक आहे. आयर्नच्या कमतरतेमुळे शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे एनिमिया होऊ शकतो.

व्हिटॅमिनची कमतरता 

व्हिटॅमिन बी १२ आणि फॉलिक एसिड हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे एनिमिया देखील होऊ शकतो.

जास्त रक्तस्त्राव 

मासिक पाळी, सर्जरी किंवा दुखापतीमुळे जास्त रक्तस्त्राव झाल्यास हे हिमोग्लोबिनच्या कमतरतेचं कारण असू शकतं.

क्रोनिक आजार 

किडनीचे आजार, कॅन्सर आणि इतर काही क्रोनिक आजारांमुळे हिमोग्लोबिनची कमतरता देखील होऊ शकते.

खाण्यात गडबड

आयर्न आणि व्हिटॅमिन्स असलेले पदार्थ न खाल्ल्यानेही हिमोग्लोबिनची कमतरता होऊ शकते.

हिमोग्लोबिनच्या कमतरतेची लक्षणं

थकवा
अशक्तपणा
चक्कर येणं
धाप लागणं
त्वचा पिवळसर होणं
डोकेदुखी

तुम्हाला अशक्तपणा वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
 

Web Title: due to these 5 reasons there is deficiency of hemoglobin in the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.