मेंदुच्या नसा फाटण्याआधी येतो मिनी अटॅक, जाणून घ्या लक्षणे आणि वेळीच व्हा सावध...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 12:52 PM2023-05-03T12:52:03+5:302023-05-03T12:52:52+5:30

Brain Stroke Symptoms: तुम्हाला ब्रेन स्ट्रोकबाबत माहीत आहे का? याची लक्षण हलकी असतात. जे आधीच ओळखून मोठ्या अटॅक टाळता येऊ शकतो.

Early brain stroke or mini stroke symptoms early signs of stroke | मेंदुच्या नसा फाटण्याआधी येतो मिनी अटॅक, जाणून घ्या लक्षणे आणि वेळीच व्हा सावध...

मेंदुच्या नसा फाटण्याआधी येतो मिनी अटॅक, जाणून घ्या लक्षणे आणि वेळीच व्हा सावध...

googlenewsNext

Brain Stroke Symptoms: जेव्हा मेंदुमध्ये एखादी नस ब्लॉक होते तेव्हा ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) येतो. ही एक जीवघेणी स्थिती आहे. ज्यावर वेळीच उपचार केला नाही तर मृत्यूही होऊ शकतो. पण तुम्हाला ब्रेन स्ट्रोकबाबत माहीत आहे का? याची लक्षण हलकी असतात. जे आधीच ओळखून मोठ्या अटॅक टाळता येऊ शकतो. याला मिनी ब्रेन स्ट्रोक किंवा ट्रांसिएंट इस्केमिक अटॅक (Mini Stroke or Transient Ischaemic Attack; TIA) असंही म्हणतात.

मेंदुमध्ये मिनी अटॅक कधी येतो?

ब्रेन स्ट्रोकचा मिनी अटॅक मेंदुतील नसा ब्लॉक झाल्याने येतो. NHS नुसार, यामुळे मेंदुला ऑक्सिजन मिळणं बंद होतं. पण हा डॅमेज परमनंट नसतो आणि 24 तासात आपोआप ठीक होतो. पण याच्या लक्षणांना हलक्यात घेऊन चालत नाही. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

मिनी ब्रेन स्ट्रोकची लक्षणे

शरीराच्या एका भागावर चेहरा, हात आणि पायांमध्ये कमजोरी

अचानक कन्फ्यूजन

अचानक बोलण्यात अडचण

अचानक बघण्यात समस्या

अचानक शारीरिक संतुलन बिघडणं

अचानक चालण्यात समस्या

चक्कर येणे

विनाकारण डोकेदुखी

काही गिळण्यात अडचण

चेहऱ्यावरील मांसपेशी पडणं

24 तासात गायब होतात लक्षणं

नसांमध्ये ब्लड क्लॉट जमा झाल्याने मिनी स्ट्रोक येतो. ज्यामुळे रक्तप्रवाह योग्यपणे होत नाही. पण हे ब्लड क्लॉट काही काळांसाठी असतात. पण याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. 

मिनी स्ट्रोकपासून वाचण्याच्या टिप्स

धूम्रान आणि मद्यसेवन बंद करा

ताजी फळं, भाज्या आणि कडधान्याचं सेवन करा

वजन कंट्रोलमध्ये ठेवा

नियमित एक्सरसाइज करा

फॅटचं सेवन कमी करा

स्ट्रोकपासून वाचण्याचा आहार

ब्रेन स्ट्रोकपासून वाचण्यासाठी लो फॅट, कमी मिठासोबत हाय फायबर असलेला आहार घेतला पाहिजे. ज्यासाठी तुम्ही या फूड्सचं सेवन करू शकता.
पेर, स्ट्रॉबेरी, एवोकाडो, सफरचंद, केळी, गाजर, बीट, ब्रोकली, पालक, टोमॅटो, डाळी, राजमा, छोले, क्विनोआ, ओट्स, बदाम, चिया सीड्स, रताळे इत्यादी.

Web Title: Early brain stroke or mini stroke symptoms early signs of stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.