ही छोटी छोटी लक्षण सांगतात वाढत आहे ब्लड कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 09:50 AM2023-05-08T09:50:04+5:302023-05-08T09:50:59+5:30
Blood Cancer Symptoms : ब्लड कॅन्सरमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. जास्तीत जास्त केसेसमध्ये ब्लड कॅन्सरचे सगळे प्रकार बोन मेरोपासून सुरू होतात. हा सॉफ्ट टिश्यू हाडांच्या आत असतो, जिथे रक्त कोशिका तयार होतात.
Blood Cancer Symptoms : कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यातील एक भयंकर कॅन्सर म्हणजे रक्ताचा कॅन्सर म्हणजेच ब्लड कॅन्सर. ज्याला मेडिकल भाषेत ल्यूकेमिया असं म्हणतात. ब्लड कॅन्सरमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. जास्तीत जास्त केसेसमध्ये ब्लड कॅन्सरचे सगळे प्रकार बोन मेरोपासून सुरू होतात. हा सॉफ्ट टिश्यू हाडांच्या आत असतो, जिथे रक्त कोशिका तयार होतात.
ब्लड कॅन्सरचे मुख्य प्रकार ल्यूकेमिया, लिंफोमा, मायलोइड्सप्लास्टिक सिंड्रोम (एमडीएस), मायलोप्रोलिफेरेटिव डिसऑर्डर (एमपीडी) आणि मल्टीपल मायलोमा आहे. या सगळ्यांचे शरीरावर वेगवेगळे प्रभाव बघायला मिळतात. पण काही संकेत आणि लक्षण एकसारखीच दिसतात. ज्यांकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. चिंतेची बाब ही आहे की, बऱ्याचदा काही रूग्णांमध्ये याची लक्षण दिसत नाहीत. चला जाणून घेऊ काही लक्षण....
खोकला किंवा छातीत वेदना
ब्लड कॅन्सर झाल्यावर तुम्हाला खोकला किंवा छातीत वेदना होऊ शकते. याचं कारण प्लीहामध्ये असामान्य रक्त कोशिका तयार होणं हे आहे. असं काही जाणवलं तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा.
पुन्हा पुन्हा संक्रमण होणं
जर तुम्ही सतत आजारी पडत असाल किंवा सहजपणे तुम्हाला इन्फेक्शन होत असेल, तुम्हाला लगेच ताप येत असेल आणि थंडी वाजत असेल तर वेळीच सावध व्हा. असं तुमच्या शरीरातील आजारांशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त कोशिका कमी झाल्याने होऊ शकतं.
सहज जखम होणे आणि रक्त वाहने
जर तुमच्या शरीरावर पुरळ येत असेल, खाज येत असेल, पटकन जखम होते आणि रक्त वाहत राहतं तर हा एक संकेत आहे. प्लेटलेट्स कमी झाल्याने असं होतं, ज्या अशा कोशिका आहेत ज्या रक्त घट्ट बनवण्यास मदत करतात.
भूक न लागणे
भूक न लागणे किंवा मळमळ वाटणेही ब्लड कॅन्सरचा संकेत असू शकतो. हे तुमच्या शरीरात असामान्य रक्त कोशिका तयार झाल्याने होतं. ज्यामुळे तुमच्या पोटावर दबाव पडतो.
नेहमी थकवा राहणे
सतत कमजोरी आणि थकवा ब्लड कॅन्सरचा संकेत असू शकतो. हे पुरेशा लाल रक्तपेशी नसल्याने होऊ शकतं. ज्यामुळे तुम्हाला एनीमिया होऊ शकतो.
ब्लड कॅन्सरची लक्षणं
रात्री घाम येणे, श्वास घेण्यास समस्या, मानेच्या लिम्फ नोडमध्ये सूज, अचानक वजन कमी होणे, ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त निघणे सुद्धा ब्लड कॅन्सरची लक्षण असू शकतात. ही लक्षण दिसली तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा.